एक्स्प्लोर

Sindhutai Sapkal : एका युगाचा अंत! अनाथांसाठी आयुष्य झिजवणाऱ्या सिंधुताईंचा 750 हून अधिक पुरस्काराने सन्मान

Sindhutai Sapkal : अनाथांची माय असलेल्या सिंधुताई सपकाळ यांना या वर्षीच्या 'पद्मश्री' पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

पुणे : राज्यामध्येच नव्हे तर संपूर्ण देशात आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवणाऱ्या, अवघं आयुष्य अनाथांच्या सेवेमध्ये झिजवणाऱ्या 'अनाथांची माय' अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचं आज निधन झालं. पुण्यातील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांना नुकताच 2021 सालचा पद्मश्री हा पुरस्कार मिळाला होता. 

समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी अनाथांसाठी केलेले कार्य लक्षात घेऊन त्यांना अनेक पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 2021 सालचा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता. तसेच त्यांना पुणे विद्यापीठाचा 'जीवन गौरव पुरस्कार' आणि महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. 'अनाथांची माय' अशी ओळख असलेल्या सिंधुताईंना तब्बल 750 हून अधिक पुरस्कारांने गौरवण्यात आलं आहे. 

सिंधुताईंना मिळालेले महत्त्वाचे पुरस्कार खालीलप्रमाणे, 

  • पद्मश्री पुरस्कार (2021)
  • डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार (2017)
  • प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (2015)
  • मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (2013)
  • महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (2012)
  • सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला 'रिअल हीरो पुरस्कार' (2012)
  • पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा 'कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार' (2012)
  • महाराष्ट्र शासनाचा 'अहिल्याबाई होळकर पुरस्कार' (2010)
  • दैनिक लोकसत्ताचा 'सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार' (2008)
  • पुणे विद्यापीठाचा 'जीवन गौरव पुरस्कार'
  • आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार (1996)
  • सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार
  • राजाई पुरस्कार
  • शिवलीला महिला गौरव पुरस्कार
  • 'सामाजिक सहयोगी पुरस्कार' (1992)

सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला 'मी सिंधुताई सपकाळ' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर भार्गव फिल्म्स ॲन्ड प्रॉडक्शनचा ’अनाथांची यशोदा’ या नावाचा अनुबोधपट 2014 साली प्रदर्शित झाला आहे.

संबंधित बातमी : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus 3rd Test : DSP सिराजच्या 'ट्रिक'मध्ये लॅबुशेन फसला; नितीश रेड्डीचा बॉल अन् कोहलीचा 'तो' कॅच, जाळ्यात कसं अडकवलं, VIDEO
DSP सिराजच्या 'ट्रिक'मध्ये लॅबुशेन फसला; नितीश रेड्डीचा बॉल अन् कोहलीचा 'तो' कॅच, जाळ्यात कसं अडकवलं, VIDEO
16-17 स्कॉर्पियो आल्या, 40-50 गुंड उतरले, पवनचक्की गुंड गावकऱ्यांना धमकवत सूटले, बीडनंतर धाराशिवमध्ये संतापजनक घटना
16-17 स्कॉर्पियो आल्या, 40-50 गुंड उतरले, पवनचक्की गुंड गावकऱ्यांना धमकवत सूटले, बीडनंतर धाराशिवमध्ये संतापजनक घटना
Maharashtra weather Update: झटपट शेकोट्या पेटवा! राज्यात बोचरी थंडी, गार वाऱ्यांनी तापमान घटलं, पुढील 3 दिवस काय स्टेटस? वाचा IMD चा अंदाज
झटपट शेकोट्या पेटवा! राज्यात बोचरी थंडी, गार वाऱ्यांनी तापमान घटलं, पुढील 3 दिवस काय स्टेटस? वाचा IMD चा अंदाज
Abdus Salam : पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 15 डिसेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7AM : 15 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM :  15 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNational Television Award ABP Majha | नॅशनल टेलिव्हिजन अवॉर्डमध्ये ABP माझाचा डंका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus 3rd Test : DSP सिराजच्या 'ट्रिक'मध्ये लॅबुशेन फसला; नितीश रेड्डीचा बॉल अन् कोहलीचा 'तो' कॅच, जाळ्यात कसं अडकवलं, VIDEO
DSP सिराजच्या 'ट्रिक'मध्ये लॅबुशेन फसला; नितीश रेड्डीचा बॉल अन् कोहलीचा 'तो' कॅच, जाळ्यात कसं अडकवलं, VIDEO
16-17 स्कॉर्पियो आल्या, 40-50 गुंड उतरले, पवनचक्की गुंड गावकऱ्यांना धमकवत सूटले, बीडनंतर धाराशिवमध्ये संतापजनक घटना
16-17 स्कॉर्पियो आल्या, 40-50 गुंड उतरले, पवनचक्की गुंड गावकऱ्यांना धमकवत सूटले, बीडनंतर धाराशिवमध्ये संतापजनक घटना
Maharashtra weather Update: झटपट शेकोट्या पेटवा! राज्यात बोचरी थंडी, गार वाऱ्यांनी तापमान घटलं, पुढील 3 दिवस काय स्टेटस? वाचा IMD चा अंदाज
झटपट शेकोट्या पेटवा! राज्यात बोचरी थंडी, गार वाऱ्यांनी तापमान घटलं, पुढील 3 दिवस काय स्टेटस? वाचा IMD चा अंदाज
Abdus Salam : पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
अतिइंग्रजीचं प्रेम मातृभाषेच्या जीवावर, मुलं मराठी शाळेत घाला, माझा कट्ट्यावर भालचंद्र नेमाडेंनी मांडली रोखठोक भूमिका 
अतिइंग्रजीचं प्रेम मातृभाषेच्या जीवावर, मुलं मराठी शाळेत घाला, माझा कट्ट्यावर भालचंद्र नेमाडेंनी मांडली रोखठोक भूमिका 
EPFO: पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्डद्वारे काढता येणार? किती पगारावर किती रुपये मिळणार?  
पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्डद्वारे काढता येणार? किती पगारावर किती रुपये मिळणार?  
One Nation One Election : 'एक देश एक निवडणूक' घटनादुरुस्तीत काय म्हटलंय? विधानसभांचा कार्यकाल किती असणार? 
'एक देश एक निवडणूक' घटनादुरुस्तीत काय म्हटलंय? विधानसभांचा कार्यकाल किती असणार? 
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्रिपदाचं पहिलं नाव समोर, सुनील तटकरेंचा नरहरी झिरवाळ यांना फोन
दादांच्या राष्ट्रवादीतील पहिलं नाव समोर, नरहरी झिरवाळ यांना सुनील तटकरेंचा शपथविधीसाठी फोन
Embed widget