एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

दहा वर्षाच्या विजयची कमाल, 1111पर्यंत पाढे पाठ, मोबाईलच्या उपयोगाने तीन विदेशी भाषांसह 20 देशांची राष्ट्रगीतं तोंडपाठ!

वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावातील विजय तुळसकर या मुलाने स्पॅनिश, इटालियन आणि जर्मन या देशाच्या भाषा डुलिंगो या अॅपच्या माध्यमातून शिकल्या.

सिंधुदुर्ग : सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे. मोबाईल किंवा  इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊ शकतो. कोरोनामुळे जग ठप्प झालं. त्यामुळे अनेकांनी वर्कफ्रॉम होम तर विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण सुरु केलं. लॉकडाऊनमध्ये शाळा बंद असल्याने ऑनलाइन अभ्यासासाठी मुलांच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आले. याच मोबाईलच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तुळशीवृंदावनासाठी प्रसिद्ध असलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावातील विजय तुळसकर या मुलाने स्पॅनिश, इटालियन आणि जर्मन या देशाच्या भाषा डुलिंगो या अॅपच्या माध्यमातून शिकल्या. त्यासोबत लहानपणापासून संगीताची आवड असल्याने हार्मोनियमही उत्तम प्रकारे शिकला असून हार्मोनियम सरळ तर वाजवतोच मात्र उलट करून, उलट्या दिशेने, झोपून अशा पध्दतीने तो एकही स्वर आजूबाजूला न करता उत्तम हार्मोनियम वाजवतो. 1111 पर्यंतचे पाढे अगदी तोंडपाठ. नेपाळ, अमेरिकेसह 20 देशांची राष्ट्रगीतंही त्याच्या तोंडपाठ आहेत.

मोबाईलच्या माध्यमातून आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर विजय तुळसकरला ब्रह्मांडापलीकडे काय आहे  हे जाणून घ्यायचं आहे. इयत्ता तिसरीमध्ये त्याचे 1111 पर्यंतचे पाढे अगदी तोंडपाठ आहेत. आकडेमोडीत तर तो कॅल्क्युलेटरलाही मागे टाकतो. चीन, नेपाळ, अमेरिकेसह 20 देशांची राष्ट्रगीतंही तो चांगल्या तालासुरात गातो, तेही हार्मोनियमवर. विजयला मोठं होऊन वैज्ञानिक व्हायचं त्याचं स्वप्न आहे.

दिनेश तुळसकर यांचा गावात टेलरींगचा व्यवसाय आहे. त्यातूनच ते आपल्या तीनही मुलांचा शिक्षणाचा खर्च भागवतात. विजय हा त्यांच्या घरात जन्मलेला कोहिनूर हिराचं म्हणावा लागेल. विजय नुकताच इयत्ता तिसरीतून चौथीत गेलाय मात्र तिसरीत असतानाचं त्याने चक्क 1111 पर्यंतचे पाढे तोंडपाठ केलेत. विजय इंग्लिश माध्यमातून शिक्षण घेत असल्याने हे सर्व पाढे तो इंग्लिशमध्ये न चुकता सुफरफास्ट गतीने बोलून दाखवतो. तर स्पॅनिश, जर्मन, इटाली भाषाही त्याने अवगत केल्या आहेत.

विजयला हे एवढं ज्ञान काही जादूने प्राप्त झालेलं नाही. तर त्यासाठी त्याने इंटरनेटचा योग्य वापर केला आहे. डुलिंगो या अॅपच्या माध्यमातून स्पॅनिश, जर्मन, इटाली भाषाही त्याने अवगत केल्या. घरात एकच मोबाईल असल्याने इंटरनेटवरून शिक्षण घेण्यास विजय आणि त्याच्या दोन्ही बहिणींना काही प्रमाणात अडचणी येत आहेत. विजयकडे आणखी एक असाधारण गुण आहे, तो म्हणजे त्याच संगीत कलेवर प्रचंड प्रेम आहे. हार्मोनियम वादनात तर त्याचा हातखंडा असून नवनवे प्रयोग तो करत असतो. हार्मोनियम तो उलट्या बाजूने, झोपून कशाही पद्धतीने वाजवू शकतो.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ramdas Athwale On Fadanvis : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री बनतील, शिंदेंना कोणतंच आश्वासन दिलं नव्हतंABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 26 November 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स-Sunil Bhusara Mumbai : मला मिळायला हवी ती मतं विरोधी उमेदवाराला मिळाली - सुनील भुसाराTOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha : 25 Nov 2024 : 12 Noon

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Eknath Shinde : आमचा राम राम घ्यावा! खटाखट निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा; खटाखट निर्णय घेणाऱ्या शिदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं
Nashik Crime : आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
Embed widget