एक्स्प्लोर

Nitesh Rane : नितेश राणेंना सर्वोच्च न्यायालयाने झटका दिल्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयात आज पुन्हा सुनावणी

Nitesh Rane : नितेश राणेंना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर आज जिल्हा सत्र न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार. कोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष.

Nitesh Rane : सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणेंना दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात आज पुन्हा सुनावणी होणार आहे. संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणे यांचा अटकूपर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी फेटाळला. यावेळी कोर्टानं नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात शरण जाण्यास तसंच नियमित जामिनासाठी अर्ज करावा, असे निर्देश दिले होते. यासाठी कोर्टाने नितेश राणे यांना 10 दिवसांची मुदत दिली होती. तसंच तोपर्यंत त्यांना अटक करु नये, असे निर्देश देत दिलासा दिला होता. 

न्यायालयाच्या निर्देशांनुसार, नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर झाले होते. मात्र त्यावेळी सरकारी वकील अनुपस्थित राहिल्याने ती सुनावणी आज पार पडणार आहे. संतोष परब हल्लाप्रकरणी चौकशीसाठी पोलिसांना नितेश राणेंची कोठडी हवी आहे. याप्रकरणी सरकारी वकील आणि पोलिसांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर न्यायालय आपला निर्णय देणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. 

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी नितेश राणे आरोपी आहेत. कणकवली पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे. या प्रकरणातील अटक टाळण्यासाठी नितेश राणे यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर राणे यांनी मुंबई उच्च न्यायलयात धाव घेतली. उच्च न्यायलयानेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. हायकोर्टाच्या आदेशाविरोधात राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं राणे यांना 10 दिवसात जिल्हा न्यायलयात शरण जाण्याचे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयानं राणे यांना 10 दिवस अटकेपासून संरक्षण दिले होते. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शुक्रवारी नितेश राणे यांनी जिल्हा कोर्टात हजेरी लावली होती. यावेळी त्यांचे बंधू निलेश राणेदेखील उपस्थित होते. नितेश राणे यांच्या बाजूने अॅड. सतीश मानशिंदे आणि अॅड. संग्राम देसाई यांनी बाजू मांडली. तर, सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांचे म्हणणे कोर्टाने मागवले होते. अॅड. भूषण साळवी यांनी ऑनलाइन सरकारी वकील म्हणून बाजू मांडली होती.  मात्र, कोर्टाने अॅड. घरत हजर नसल्याने पुढील सुनावणी ठेवली आहे. 

काय आहे प्रकरण?  

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे वादाच्या भावर्‍यात आडकले आहेत. 18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Eng T20 Squad : हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
Torres Scam : ग्राहकांना 14 महागड्या कार गिफ्ट म्हणून दिल्या, एक गाडी शोरुममध्ये ठेवत प्रलोभन दाखवलं, टोरेसचे नवनवे कारनामे समोर  
गुंतवणूकदारांना 14 महागड्या कार गिफ्ट देत प्रलोभन दाखवलं, एक गाडी शोरुममध्ये ठेवली, टोरेसचे कारनामे समोर
Maharashtra Weather: ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
Anand Mahindra : पत्नीसोबत वेळ घालवायला आवडतं... आनंद महिंद्रांची 90 तास कामाच्या चर्चेत एंट्री, म्हणाले 10 तासही पुरेसे पण...
40 तास, 70 तास, 90 तास काय 10 तासही पुरेसे पण... आनंद्र महिंद्रा कामाच्या तासांबद्दल काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Jan 2025 : ABP MajhaSthanik Swarajya Sanstha :स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांनंतर Ravindra Chavan प्रदेशाध्यक्ष?Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 12 Jan 2025 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा | 6.30 AM | 12 Jan 2025 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Eng T20 Squad : हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
Torres Scam : ग्राहकांना 14 महागड्या कार गिफ्ट म्हणून दिल्या, एक गाडी शोरुममध्ये ठेवत प्रलोभन दाखवलं, टोरेसचे नवनवे कारनामे समोर  
गुंतवणूकदारांना 14 महागड्या कार गिफ्ट देत प्रलोभन दाखवलं, एक गाडी शोरुममध्ये ठेवली, टोरेसचे कारनामे समोर
Maharashtra Weather: ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
Anand Mahindra : पत्नीसोबत वेळ घालवायला आवडतं... आनंद महिंद्रांची 90 तास कामाच्या चर्चेत एंट्री, म्हणाले 10 तासही पुरेसे पण...
40 तास, 70 तास, 90 तास काय 10 तासही पुरेसे पण... आनंद्र महिंद्रा कामाच्या तासांबद्दल काय म्हणाले?
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
पुण्यात पोलिसच असुरक्षीत! नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
पुण्यात पोलिसच असुरक्षीत! नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Embed widget