शिंदे सरकार राजकोट किल्ल्यावर 100 कोटींंचा सरकारी खजिना ओतणार; 167 गुंठ्यात उभरणार न भूतो न भविष्यति अशी शिवसृष्टी
राजकोट किल्ल्यावर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फूट उंच तलवारधारी पुतळा उभारणार आहे. तसेच या पुतळ्याजवळ शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर (Malvan Rajkot) 100 कोटी रुपये खर्चून शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांपुढे, शिक्षणमंत्री दीपक केसरकरांच्या खात्याकडून प्रेझेंटेशन सादर करण्यात आले आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह 100 कोटी खर्चून ही शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. या शिवसृष्टीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतरिम मंजूरी देणार असल्याची माहिती आहे. यामध्ये शिवसृष्टीमध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास इतिहासप्रेमींना पाहता येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमी भावना संतप्त होत्या. 26 ऑगस्टला ही घटना घडल्यानंतर आता तब्बल एका महिन्याच्या आत राज्य सरकारने मालवण मधील राजकोट किल्ल्यावर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फूट उंच तलवारधारी पुतळा उभारणार आहे. तसेच या पुतळ्याजवळ शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. तसंच त्याठिकाणी फिश अॅक्वेरिअम आणि म्युझियमही असणार आहे.
167 गुंठ्यावर उभारणार शिवसृष्टी
शिवसृष्टी उभारण्यासाठी राजकोट किल्ल्याच्या बाजूला सुमारे 167 गुंठे जागा उपलब्ध असून, ती पर्यटनासाठी आरक्षित आहे. याशिवाय या परिसरात जेटीदेखील उभारली जाणार असून, ज्यामुळे राजकोट किल्ल्यावरून बोटीने थेट सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाता येणार आहे. संपूर्ण देशाला आदर्शवत ठरेल, अशा मत पद्धतीने शिवसृष्टी उभारली जाणार आहे, त्यामुळे पर्यटकांचे आकर्षणही ठरणार आहे. तसेच या शिवसृष्टीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतरिम मंजुरी दिली जाणार आहे.
कसा असणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा?
नवीन पुतळा उभारण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महायुती सरकारने तातडीने हाती घेतले आहे.स्टॅच्यू ऑफ लिबर्टी म्हणून ओळखले जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल या पुतळाच्या धर्तीवर मालवणमध्ये राजकोट किल्लावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फूट उंच तलवारधारी पुतळा उभारण्यात येणार आहे. यामध्ये सर्व गोष्टींची काळजी देखील घेण्यात येणार आहे. नव्याने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात यावेळी कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू नयेत, यासाठी राज्य शासनाने 500 पेक्षा जास्त पानाचे निकष असणारी निविदा काढली आहे. मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची 100 वर्ष गॅरंटी असणार आहे, अशी माहिती देखील हा निविदेत आहे.
हे ही वाचा :
महाराजांच्या पुतळ्याची वेल्डिंग बिघडली की बिघडवली? वैभव नाईकांना पोलिसांनी बोलवले चौकशीला