एक्स्प्लोर

Sindhudurg District Bank Election : दुसऱ्याचे अडीच कोटी भरता, मग तुमची थकबाकी का भरत नाही? दीपक केसरकरांचं राणेंवर टीकास्त्र

Sindhudurg District Bank Election : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच नाव न घेता आमदार दीपक केसरकरांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टोला लगावला आहे.

Sindhudurg District Bank Election : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या प्रचाराचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. आमदार दीपक केसरकर यांचे राणेंच्या विरोधातील उग्ररूप बँक निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे. एका दिवसामध्ये 36 लाख कोणी भरलेत? याची चौकशी झालीच पाहिजे. तुम्ही दुसऱ्याचे अडीच कोटी भरता, मग तुमची थकबाकी तुम्हाला का भारत येत नाही? असा सवाल उपस्थित करत दीपक केसरकरांनी नारायण राणेंवर निशाणा साधला आहे.

शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय प्रकाश गवस यांना ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. यावरून दीपक केसरकर यांनी नारायण राणेंना टार्गेट केलं. याच प्रवेशासाठी एका दिवसात 36 लाख कोणी भरलेत? याची चौकशी झालीच पाहिजे. इतकेच नव्हे तर दुसऱ्याचे जर आपण अडीच कोटी भरता, मग तुमची थकबाकी तुम्ही का नाही भरत? असा सवाल उपस्थित केला आहे. केसरकर यांनी राणेंवर थेट आरोप केल्यानं निश्चितच जिल्हा बँक निवडणूकचे वातावरण तापणार आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडणून आणण्यासाठी स्वतः दीपक केसरकर (Deepak Kesarkar) पुन्हा एकदा मैदानात उतरून राणेंना उत्तर देण्यासाठी सक्रिय झाल्याचं चित्र पहावयास मिळत आहे. 

"जर कोणी कोट्यवधी रुपयांच्या फायद्यासाठी अडीच कोटी भरणार असेल. तर ते फायद्यासाठी कोणीही करणार. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करणारे व्यापारी आहेत. त्याच्यामुळे गुजरातीमध्ये अशी म्हण आहे की, 'राजा व्यापारी, प्रजा भिकारी'. ही म्हण नेहमी कोकणी लोकांनी लक्षात ठेवावी. आणि जे असे व्यापर करणारे राजकारणी आहेत, त्यांच्यापासून बोध घेऊन अशा राजकारणी लोकांच्या हातामध्ये ही बँक जाऊ नये याच्यासाठी त्यांनी योग्य ती पावले उचलावी", असं आव्हाहन आमदार दीपक केसरकर यांनी केलं आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच नाव न घेता आमदार दीपक केसरकरांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टोला लगावला आहे. ते जर इथे डीफॉल्टर असतील तर ते आणि काय करणार आहेत? ते अमित शहांचं कर्ज घेऊन आणि डीफॉल्टर होतील. यापलीकडे काय करू शकणार नाहीत. बँक ही डीफॉल्टरवर चालत नाही, बँक ही चांगल्या ठेवीदारांवर आणि चांगल्या कर्जदारांवर चालते आणि ते चांगले कर्जदार नाहीत, हे हायकोर्टाने सांगितले आहे. तुम्ही थकबाकीमध्ये आहे. त्यामुळे इथे लोकांनी विचार केला पाहिजे की, असे जे बँकेची कर्ज घेऊन ते डीफॉल्टर आहेत, अशा लोकांच्या आव्हानाला लोकांनी किंमत देता कामा नये, असंही ते म्हणाले.  

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत फॉर्म वैध ठरत असता, तर ते भरू शकले असते. त्याचे नेते करू शकले असते. ते केंद्रात मंत्री आहेत. पण करू शकणार नाहीत, असा टोला आमदार नितेश राणे यांना नाव न घेता आमदार दीपक केसरकरांनी लगावला आहे. तसेच जे लोक निवडणुकीत बोलेरो गाड्या घेऊ शकतात, बँकेच्या कर्जातून ते काहीही करू शकतात बँकेचं. त्यामुळे मी अधिक काही बोलत नाही, अधिकची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्षाकडे आहे, असं म्हणत त्याच्याकडे बोट दाखवलं. त्यावेळी वेळोवेळी ही माहिती समोर येईल,  असं म्हणत हिमनग केवढा मोठा आहे. त्याबद्दल जिल्हा बँक अध्यक्ष सांगतील अशी, मिश्कील टिपणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर दीपक केसारकरांनी केली आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
ED Raid on I-PAC: बंगालमध्ये निवडणूक तोंडावर येताच ईडी कामाला लागली; थेट तृणमूल काँग्रेसची स्ट्रॅटेजी बनवणाऱ्या फर्मवर धाड, स्वत: ममता दीदी पोहोचल्या
बंगालमध्ये निवडणूक तोंडावर येताच ईडी कामाला लागली; थेट तृणमूल काँग्रेसची स्ट्रॅटेजी बनवणाऱ्या फर्मवर धाड, स्वत: ममता दीदी पोहोचल्या
शरद पवार सिंह, अजित दादा वाघ, आम्ही लांडग्यांकडे लक्ष देत नाही; राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार
शरद पवार सिंह, अजित दादा वाघ, आम्ही लांडग्यांकडे लक्ष देत नाही; राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार
Gold Silver Rate : दुसऱ्या दिवशी चांदीचे दर गडगडले, 12225 रुपयांची घसरण, सोनं देखील स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
दुसऱ्या दिवशी चांदीचे दर गडगडले, 12225 रुपयांची घसरण, सोनं देखील स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर

व्हिडीओ

Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
ED Raid on I-PAC: बंगालमध्ये निवडणूक तोंडावर येताच ईडी कामाला लागली; थेट तृणमूल काँग्रेसची स्ट्रॅटेजी बनवणाऱ्या फर्मवर धाड, स्वत: ममता दीदी पोहोचल्या
बंगालमध्ये निवडणूक तोंडावर येताच ईडी कामाला लागली; थेट तृणमूल काँग्रेसची स्ट्रॅटेजी बनवणाऱ्या फर्मवर धाड, स्वत: ममता दीदी पोहोचल्या
शरद पवार सिंह, अजित दादा वाघ, आम्ही लांडग्यांकडे लक्ष देत नाही; राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार
शरद पवार सिंह, अजित दादा वाघ, आम्ही लांडग्यांकडे लक्ष देत नाही; राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार
Gold Silver Rate : दुसऱ्या दिवशी चांदीचे दर गडगडले, 12225 रुपयांची घसरण, सोनं देखील स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
दुसऱ्या दिवशी चांदीचे दर गडगडले, 12225 रुपयांची घसरण, सोनं देखील स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
US Russia Sanctions Bill: तर भारतावर 50 वरून थेट 500 टक्के टॅक्स? डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाविरुद्ध कठोर निर्बंध लादणाऱ्या विधेयकाला मंजुरी
तर भारतावर 50 वरून थेट 500 टक्के टॅक्स? डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाविरुद्ध कठोर निर्बंध लादणाऱ्या विधेयकाला मंजुरी
Latur Mahanagarpalika Eknath Shinde Shivsena: तब्बल 38 अपक्ष उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; एकनाथ शिंदेंची लातूरमध्ये मोठी खेळी, भाजप-काँग्रेसला शह!
तब्बल 38 अपक्ष उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; एकनाथ शिंदेंची लातूरमध्ये मोठी खेळी, भाजप-काँग्रेसला शह!
मोठी बातमी! नव्याने निवडून आलेल्या 11 नगरसेवकांचा अख्खा गटच भाजपात, काँग्रेसला 'दे धक्का'
मोठी बातमी! नव्याने निवडून आलेल्या 11 नगरसेवकांचा अख्खा गटच भाजपात, काँग्रेसला 'दे धक्का'
सुप्रीम कोर्टात उमर खालिद, शरजील इमामला जामीन नाकारला, JNU मध्ये मोदी शाहांविरुद्ध नारेबाजी, एफआयआर दाखल; विद्यार्थ्यांची ओळख पटली
सुप्रीम कोर्टात उमर खालिद, शरजील इमामला जामीन नाकारला, JNU मध्ये मोदी शाहांविरुद्ध नारेबाजी, एफआयआर दाखल; विद्यार्थ्यांची ओळख पटली
Embed widget