एक्स्प्लोर
सिंधुदुर्गात दोन सख्ख्या भावंडांचा नदीत बुडून मृत्यू
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण गोठणे गावात कोंड नदीवर ही घटना घडली.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात नदीवर आंघोळीला गेलेल्या सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. तिसऱ्या बहिणीचा जीव वाचवण्यात आला. मालवण गोठणेतील आचरेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण गोठणे गावात कोंड नदीवर ही घटना घडली. गावातली तीन सख्खी भावंडं नेहमीप्रमाणे आंघोळीला गेली होती. त्यावेळी दुपारी बारा वाजताच्या सुमारास 23 वर्षीय सुवर्णा दशरथ आचरेकर आणि 19 वर्षीय आकाश दशरथ आचरेकर यांचा बुडून मृत्यू झाला.
22 वर्षांच्या दीपाली दशरथ आचरेकरला वाचवण्यात गावकऱ्यांना यश आलं. घरापासून अवघ्या काही अंतरावर नदी आहे. ही भावंडं नेहमीच आंघोळीला नदीवर जात होती.
या घटनेमुळे आचरेकर कुटुंब दुःखात बुडालं असून गोठणे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement