एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आंबोलीजवळच्या कावळेसाद पॉईंटवर नेमकं काय घडलं?
दोन तरुण फुल्ल दारुच्या नशेत स्टंटबाजी करत होते. सुरक्षा कठड्यावर बसून त्यांची मस्ती सुरु होती. एकाच्य हातात दारुची बाटली होती. ती बाटली तो पँटमध्ये ठेवताना व्हिडीओत दिसतं.
सिंधुदुर्ग: आंबोलीतील कावळेसादच्या दरीत कोसळलेल्या दोन तरुणांचा मृत्यू हा नशेत झाला असल्याचं आता समोर आलं आहे.
ही सगळी घटना एका प्रत्यक्षदर्शीनं आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केली आहे. धक्कादायक म्हणजे हे दोघेही थेट 600 फूट खोल दरीत कोसळताना या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहेत.
सोमवारी संध्याकाळी गडहिंग्लजमधल्या 7 तरुणांचा एक ग्रुप वर्षा पर्यटनासाठी आंबोलीत पोहोचला. सगळे जण जेवायला बसलेले असताना, इम्रान गार्दी आणि प्रताप राठोड हे दोघे धबधब्याच्या सांडव्यावर बसले होते.
पण नशेच्या अंमलाखाली असलेल्या दोघांनी सुरक्षा कठडा ओलांडला आणि त्यातच दोघांचा तोल गेला. त्यानंतर दोघेही थेट 600 फूट खोल दरीत कोसळले.
आंबोलीतल्या या घटनेनं एक प्रश्न मात्र एबीपी माझानं उपस्थित केला आहे. की पर्यटनस्थळी दारुवर बंदी का घालू नये?
नेमकं धबधब्याजवळ काय घडलं?
दोन तरुण फुल्ल दारुच्या नशेत स्टंटबाजी करत होते. सुरक्षा कठड्यावर बसून त्यांची मस्ती सुरु होती. एकाच्य हातात दारुची बाटली होती. ती बाटली तो पँटमध्ये ठेवताना व्हिडीओत दिसतं.
यानंतर दोघे परत कठड्यावरुन खाली उतरतात. त्यातला एक जण जवळच्या पाण्यात पडतो. तो बाहेर येतो, आणि दोघे पुन्हा त्या कठड्याकडे जातात.
दारुच्या नशेमुळे दोघांना चालताही येत नाही. मात्र तरीही कसेबसे ते धडपडत वर कठड्यावर चढतात. ते तिथेच थांबत नाहीत, कठड्यावर दरीच्या बाजूला उतरतात. आधीच चालता येत नाही त्यातच दरीच्या बाजूला उभं राहिल्यानंतर, दोघे धडपडले आणि थेट सहाशे फूट खाली कोसळले.
मृतदेह बाहेर काढण्यात अढथळे
कावळेसाद पॉईंटवर तुफान पाऊस आणि प्रचंड वारा आहे. त्यामुळे हे दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यास अडथळे निर्माण होत आहेत.
दोन्ही मृतदेह हे धबधब्याच्या खाली अडकले आहेत. ते मृतदेह काढण्यासाठी पाण्याचा प्रवाह आणि धुकं कमी होणं आवश्यक आहे. रानवाटेतून जाऊन खांद्यावरुन मृतदेह घेऊन येणं शक्य नाही, असं आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
VIDEO
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement