एक्स्प्लोर

राज्यभरात गणरायाचं आगमन! कोविडच्या सावटाखाली अनेक ठिकाणी साधेपणाने उत्सव, लोकांचा उत्साह शिगेला

Ganesh Chaturthi 2021: राज्यभरात गणरायाचं आगमन होत आहे. कोविडच्या सावटाखाली अनेक ठिकाणी साधेपणाने उत्सव साजरा होत असून लोकांचा उत्साह शिगेला पोहचलाय.

मुंबई : भाद्रपद महिना लागला की सगळ्यांना चाहूल लागते ती लाडक्या बाप्पाची. बाप्पाच्या आगमनासाठी सगळे सज्ज होतं असतात. मात्र, यंदाच्या वर्षीही कोरोनाचे सावट असल्याने गणेशोत्सव साधेपणानेच साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. नागरिकही मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करताना दिसत आहेत. दुसरीकडे यंदाच्या वर्षी अतिवृष्टीचा मोठा फटका राज्याला बसला आहे. याच आठवड्यात मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशी परिस्थिती असली तरी राज्यभरात गणरायाचं आगमन उत्साहाच होत आहे.

कोकणात गणेशोत्सावाची धामधूम
एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे गणपती बाप्पाचे आगमन. कोकणातला गणेशोत्सव म्हटलं तर धूमधडाक्यात नेहमीच साजरा होत असतो. पण गेली दोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यात शासनाने लादलेले निर्बंध यामुळे गेले दोन वर्ष गणेश उत्सव कोकणकरांना साजरा करता आला नाही. पण या वर्षी शासनाने निर्बंधात सूट दिली असल्याकारणाने हजारो चाकरमानी कोकणात गणेशोत्सवासाठी दाखल झालेले आहेत. आपल्या लाडक्या बाप्पाला डोक्यावरून घरी आणण्याची परंपरा आजही कोकणकरांनी कायम राखलेली आहे. कोरोनाचे सर्व नियम नियम पाळून कोकणात गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला जातोय. वर्षभर बंद असलेली घरे या गणेशोत्सवाच्या काळात चाकरमानी दोन दिवस अगोदर येऊन आपल्या घराची साफसफाई करून आपला लाडका बाप्पा घरात येणार यासाठी सजावट करतो आणि याच बापाचं आज प्रत्येकाच्या घरोघरी आगमन झालेलं आहे.

कोकणातील सर्वात मोठा सण गणेशोत्सवाला आजपासून सुरवात झाली आहे. तळकोकणात 68313 गणेश मूर्तीची घरोघरी प्रतिष्ठापना होणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात डोक्यावरून पारंपरिक पद्धतीने गणरायाच आगमन झालं तर काही कालावल खाडीतून बोटीतून गणेशभक्त लाडक्या बाप्पाला घेऊन जात आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणा व महसूल विभाग सज्ज आहे. सिंधुदुर्गात 32 ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. बाजारपेठा सजल्या आहेत.

पुणेकरही उत्साहात..
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वच मानाचे गणपती मंडळानी हा आनंदाचा उत्सव मागील वर्षाप्रमाणे साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मानाचे पाचही गणपतीची तसेच प्रमुख गणपती प्राणप्रतिष्ठापना उद्या दुपारपर्यंत होणार आहे. कोरोनामुळे प्रतिष्ठापनेआधी मिरवणुका निघणार नाहीत. सर्व गणपतीचे दर्शन ऑनलाईन माध्यमातून भक्तांना घेता येणार आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या शुभेच्छा 
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेशोत्सवाच्या मराठीत शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी मराठीत ट्विट करत देशवासियांना गणेश चतुर्थीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. हा शुभ प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, सौभाग्य आणि आरोग्य घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया!”

राजकारणी, सेलिब्रीटींच्या घरीही बाप्पा..
राज्यातील बहुतेक राजकारणी मंडळीच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह प्रत्येक पक्षाच्या नेत्याच्या घरी गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. चित्रपट, क्रिडी, उद्योग अशा सेलिब्रीटींच्या घरीही गणोशोत्सव साजरा केला जातो. आपल्या बाप्पाचे फोटो हे सेलिब्रीटी आपल्या चाहत्यांसोबत साजरे करत असतात.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
Embed widget