एक्स्प्लोर
उदयनराजे दोन लाख मतांनी निवडणूक हरतील, तोंडी परीक्षेत पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
महिनाभरापूर्वी उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे सातारा लोकसभेची पोटनिवडणूक महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबत होणार आहे.

मुंबई : उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे सातारा लोकसभेची पोटनिवडणूक महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने साताऱ्यात उदयनराजेंविरोधात श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली आहे. श्रीनिवास पाटील उदयनराजेंविरोधात तब्बल 2 लाख मतांच्या फरकाने जिंकतील, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा या कार्यक्रमात चव्हाण बोलत होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राष्ट्रवादीच्या तिकीटावर उदयनराजे सातारा लोकसभेची जागा जिंकले. परंतु चार महिन्यात खासदारकीचा राजीनामा देऊन ते भाजपत गेले. त्यानंर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सातारा लोकसभेची जागा लढवण्याचे मला सुचवले होते. काँग्रेस पक्षश्रेष्ठींचंही तसं मत होतं, परंतु मी शरद पवारांना म्हणालो की, साताऱ्याची पोटनिवडणूक तुम्हीच लढा.
दरम्यान, शरद पवार उदयनराजेंविरोधात पोटनिवडणूक लढतील, अशा अफवा पसरू लागल्या. त्यावर प्रतिक्रिया देताना उदयनराजे म्हणाले होते की, शरद पवार साताऱ्याची पोटनिवडणूक लढणार असतील तर मी निवडणूक लढणार नाही. याबाबत पृथ्वीराज चव्हाणांना विचारणा केल्यावर चव्हाण म्हणाले की, हा उदयनराजेंचा दिखाऊपणा होता. उदयनराजेंना असा दिखाऊपणा केला कारण त्यांना माहीत आहे की, शरद पवार निवडणूक लढणार नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे अनेक वरीष्ठ नेते महाराष्ट्रात सर्वत्र प्रचार करत असताना काँग्रेस पक्षश्रेष्ठी महाराष्ट्रात प्रचारासाठी का उतरले नाहीत? याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे विचारणा केली, त्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, सोनिया गांधींना धुळीची अॅलर्जी असल्यामुळे त्या सध्या प्रचारापासून लांब आहेत. तर राहुल गांधी कालपासून महाराष्ट्रात प्रचारसभांमध्ये सक्रीय झाले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
