एक्स्प्लोर

तुनिषा शर्मा आत्महत्येचं श्रद्धा वालकर कनेक्शन, लव्ह जिहादच्या भीतीनेच शिझान-तुनिषाचं ब्रेकअप?

Shraddha Walker murder case: लव्ह जिहादची चर्चा सुरु झाली. तेव्हा तुनिषाचा बॉयफ्रेन्ड शिझान खाननंही ब्रेकअपचं कारण  लव्ह जिहादची भीती असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Tunisha Sharma death: गेल्या महिन्यात श्रद्धा वालकर वालकर हत्याकांडाने (Shraddha Walker murder case) अख्ख्या देशाला हादरवलं होतं. पण त्याचा परिणाम टीव्ही सीरियलच्या दुनियेतल्या एका जोडीवरही झाला असेल...याची कुणालाही कल्पना नव्हती. पण दोन दिवसांपूर्वी तुनिषा शर्मानं आत्महत्या केली. आणि जेव्हा लव्ह जिहादची चर्चा सुरु झाली. तेव्हा तुनिषाचा बॉयफ्रेन्ड शिझान खाननंही ब्रेकअपचं कारण  लव्ह जिहादची भीती असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  परंतु पोलिसांनी असा कोणताही प्रकार नसून हे सर्व आरोप नाकारले आणि पुढील तपास सुरु असली माहीती दिली. 

तुनिषा धर्माने हिंदू... शिझान धर्माने मुस्लिम आहे... तुनिषाचं वय 20 शिझानचं वय 28 आहे. त्यामुळे वेगवेगळे धर्म आणि वयातलं आठ वर्षाचं अंतर, यामुळेच शिझानने ब्रेकअप केल्याची कबुली पोलिसांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण पोलिसांना त्यावर विश्वास नाहीये. दुसरीक़डे तुनिषाच्या आईने मात्र शिझानवर गंभीर आरोप केले आहेत... 

तुनिषाच्या आईचा आरोप -
तुनिषाच्या आईच्या मते, ब्रेक अपनंतर तुनिषा खचली होती.. 16 डिसेंबरला जेव्हापासून ब्रेक अप झालं... तेव्हापासून तुनिषाच्या आई वनिता या स्वतः एक दिवस आड सेटवर जात होत्या... आत्महत्येच्या दिवशी तुनिषाची आई सोबत गेली नव्हती.. त्यावेळी तुनिषाच्या आईने तुनिषाची खुशाली ड्रायव्हरकडून जाणून घेतली होती. त्या दिवशी ड्रायव्हरने तुनिषा आणि शिझान एकत्र असून जेवत असल्याची माहिती तुनिषाच्या आईला दिली होती... त्यामुळे तुनिषा आपल्या ब्रेकअपमधून सावरत असतानाच 
तिने आत्महत्या का केली?  असा प्रश्न तुनिषाच्या आईने केला आहे. पण त्या पेक्षा धक्कादायक गोष्ट ही... की या आधीही तुनिषाने शिझानच्या ब्रेक-अपनंतर आत्महत्येचा प्रयत्न केला होता... त्यावेळी शिझान खाननेच तुनिषाचा जीव वाचवण्याची माहिती शिझानने पोलिसांना दिली आहे... इतकंच नाही... तर तुनिषाची काळजी घेण्याचा सल्लाही शिझानने कुटुंबियांना दिला आहे..  

आत्महत्येच्या दिवशी नेमकं काय झालं? 
शिझानने आत्महत्येच्या दिवशी नेमकं काय झालं? याचीही माहिती पोलिसांना दिली आहे. आत्महत्येच्या एक दिवस आधी तुनिषाने अन्नाचा एकही कण खाल्ला नाही. आत्महत्येच्या दिवशी सेटवरही तुनिषाने काही खाल्लं नाही. शिझानने तुनिषाला खाणं खाण्याचा आग्रह धरला, पण तिने नकार दिला. शिझान शूटिंगसाठी मेक अप
रुममधून बाहेर पडला. पण बराच काळ तुनिषा मेकअप रुमच्या बाहेर न आल्यानं शिझान परतला. त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा आतून बंद होता. तुनिषा हाकेला प्रतिसाद देत नसल्याने शिझाने सहकाऱ्यांसह दरवाजा तोडला. तेव्हा तुनिषाने पंख्याला गळफास घेतल्याचं समोर आलं. शिझानने तुनिषाला रुग्णालयात दाखल केलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता.  

शिझानच्या जबाबावर तुनिषाच्या कुटुंबियांना विश्वास नाही. त्यांच्या मते शिझानने आपल्या लेकीचा वापर केला. आणि तिला सोडून दिल्यानेच तिने आत्महत्या केली. पोलिसांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आहेत. आणि त्यावरुनच आता चार्जशिट तयार केली जाणार आहे. पण तनिषा आत्महत्या प्रकरणात श्रद्धा वालकर प्रकरणाचं नाव आल्यानंतर पुन्हा एकदा लव्ह जिहाद मुद्दा चर्चेत आला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलंChhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget