एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हर्षवर्धन पाटलांना धक्का, दूधगंगा सहकारी संघावर लिक्वीडेटर
इंदापूर : इंदापूरच्या दूधगंगा सहकारी दूध संघावर लिक्वीडेटर नियुक्त करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या आदेशानंतर संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं असून माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.
इंदापूर तालुका दूधगंगा सहकारी दुध उत्पादक संघाची स्थापना राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सन 1998 साली केली. आजही हा संघ त्यांच्याच मार्गदर्शनाखाली चालतो. या निर्णयामुळे मात्र पाटलांना मोठा धक्का बसला आहे. लिक्विडेशनमध्ये निघाल्यामुळे राजकीय क्षेत्रात पाटलांच्या दबदब्याला फार मोठा हादरा असल्याचं म्हटलं जात आहे.
राज्य शासनाने हा आदेश 24 ऑगस्ट 2016 रोजी काढला असून लिक्विडेटर म्हणून पुणे जिल्हा दूध संघ कात्रजचे कनिष्ठ अधिकारी एम व्ही जाधव यांची नियुक्ती केली आहे. गेले तीन वर्ष हा संघ 8 कोटी रुपयांनी तोट्यात आहे, तसेच तालुका संघाने दर महा किमान सहा लाख लिटर दूध संकलन केले पाहिजे असा नियम आहे. परंतु हा संघ महिन्याला फक्त एकच लाख लिटर दूध संकलन करत होता.
दूधसंघातील कामगारांना गेली 16 महिने पगार दिला गेला नाही. दूध व्यवसाय हा मुख्य उद्देश असताना हा संघ व्यापारी गाळे काढून कन्स्ट्रक्शन करत आहे. कायदा सोडून या संघाने बरेचसे व्यवहार अनियमित केले आहेत. या कारणास्तव या संघावर लिक्विडेटरची नियुक्ती करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. या सर्व संदर्भात जळगाव जिल्हा जनरल कामगार ईटक संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी के पाटील यांनी राज्यशासनाकडे बाजू मांडली होती.
दरम्यान, हा निकाल राजकीय आकसापोटी दिला गेला असून आम्हाला 15 दिवसाची मुदत आहे. आम्ही न्याय मागण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे दूधगंगा संघाचे चेअरमन मंगेश पाटील यांनी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
सोलापूर
निवडणूक
Advertisement