एक्स्प्लोर
डोंबिवलीत शिवसेनेकडून आरोग्य अधिकाऱ्यांना ‘कचरा’भेट
डोंबिवली : डोंबिवलीत एकीकडे फेरीवाल्यांविरोधात आक्रमक झालेल्या शिवसेनेने कचरा प्रश्नावर मात्र गांधीगिरीनं आंदोलन केलं. महापालिकेने अनेक दिवसांपासून कचरा न उचललल्याने आरोग्य अधिकाऱ्यांना कचरा भेट दिला.
डोंबिवली पूर्वेकडील एका प्रभागात अनेक दिवसांपासून कचरा उचलला जात नसल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी 'फ' प्रभागाचे मुख्य आरोग्य अधिकारी वसंत देगलूरकर यांना कचरा भेट दिला. मात्र, यावेळी शिवसैनिकांचा आरोप देगलूरकर यांनी फेटाळला.
डोंबिवली पूर्वेकडील शिवमार्केट प्रभागात काही ठिकाणचा कचरा पालिका प्रशासन काही दिवसांपासून उचलत नसल्याची तक्रार शिवसेना शाखाप्रमुख संदीप नाईक यांनी केली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत सोमवारी दुपारी नाईक यांच्यासह काही शिवसैनिकांनी मुख्य आरोग्य अधिकारी देगलूरकर यांची भेट घेतली.
यावेळी ज्या ठिकाणचा कचरा उचलला जात नाही, तिथला कचरा गिफ्ट पॅक करून देगलूरकर यांना देण्यात आला. यानंतर देगलूरकर यांनी शिवसैनिकांसह संबंधित प्रभागाची पाहणी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement