एक्स्प्लोर
शिवसेनेसोबतच्या युतीवरून भाजपत असंतोष
पुणे: शिवसेनेशी युती ठेवण्यावरुन भाजप प्रदेश कार्यकारणीत जोरदार खडाजंगी. निजामाचा बाप म्हणणाऱ्यांसोबत युती ठेऊ नये असे मत यावेळी अनेकांनी मांडले.
विनोद तावडे यांनी शिवसेनेला 50 वर्षे पुर्ण झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यानंतर आगामी महापालिका-जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेशी युती ठेवायची की नाही, यावर चर्चा सुरू झाली. यावेळी प्रदेश कार्यकारणीच्या सदस्यांनी आपली परखड मते मांडली.
मधु चव्हाण यांनी यावेळी शिवसेनेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. निजामाचा बाप म्हणणाऱ्यांसोबत युती ठेऊ नका, असे मत मांडले. भाजपने स्वतंत्र निवडणुका लढाव्यात. आमच्या मनगटात तेवढे बळ आहे, अशी भूमिका चव्हाण यांनी मांडली. त्याला कार्यकर्त्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement