भाजपच्या व्यासपीठासमोरच ठाकरेंच्या माजी आमदारानं लावलं शिवसेनेचं गाणं, भाजपला डिवचलं, समर्थकांनी धरला ठेका
नाशिकमध्ये ठाकरेंच्या माजी आमदाराने भाजपच्या व्यासपीठासमोरच शिवसेनेचं गाणं लावल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना शिवसेना गाणं लावून भाजपला डिवचल्याचं पाहायला मिळालं.
Nashik : राज्यभरात मोठ्या उत्साहत गणेश विसर्जन मिरवणुका सुरु आहेत. ठिकठिकाणी ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. नाशिकमध्येही मोठ्या उत्साहत गणेश विसर्जनाच्या मिरवणुका सुरु आहेत. दरम्यान, नाशिकमध्ये ठाकरेंच्या माजी आमदाराने भाजपच्या व्यासपीठासमोरच शिवसेनेचं गाणं लावल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना शिवसेना गाणं लावून भाजपला डिवचल्याचं पाहायला मिळालं.
भाजप पदाधिकाऱ्यांसमोर शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गीते आणि ठाकरे गटाचे महानगरप्रमुख प्रथमेश गीते यांच्या समर्थकांनी ठेका धरला आहे. विविध गाण्यांच्या माध्यमातून गीतेंच्या समर्थकांनी भाजपला त्यांच्याच व्यासपीठासमोरुन डिवचल्याचं पाहायला मिळालं. भाजप पदाधिकारी देखील सगळे उभे राहून आव्हान देत होते.
नाशिकच्या मालेगावमध्ये गणेश विसर्जनला गालबोट, तणावाचे वातावरण
गेल्या दहा दिवसांपासून भक्ती, श्रद्धा आणि उत्साहात साजरा झालेल्या गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2025) समारोप आज (शनिवार, 6 सप्टेंबर) होत आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात, ढोल-ताशांच्या ठेक्यावर आणि गुलालाच्या उधळणीत गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक बाहेर पडले आहेत. नाशिक जिल्ह्यातही मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन सुरु आहे. दरम्यान, नाशिकच्या मालेगावमध्ये गणेश विसर्जनला गालबोट लागलं आहे. फाडलेल्या वर्गणी पावतीचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या मंडळाच्या सदस्याला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.
मालेगावच्या गणेश विसर्जनला गालबोट लागलं आहे. मालेगाव संगमेश्वर येथील परमात्मा गणेश मंडळाने विसर्जन थांबवले आहे. गणपती बसण्याच्या दोन दिवस अगोदर फाडलेल्या वर्गणी पावतीचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या मंडळाच्या सदस्याला मारहाण करण्यात आली आहे. सामान्य रुग्णालयात उपचार घेत असतांना पुन्हा मारहाण झाली आहे. परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. अप्पर पोलीस अधिक्षकांसह पोलिसांकडून घटनेची दाखल घेण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:























