एक्स्प्लोर

रावसाहेब दानवेंची हकालपट्टी करा; मोदी, राहुल गांधींवरील 'त्या' विधानानंतर सेना खासदार विनायक राऊतांची मागणी

दानवे गुरूजींची बुद्धी भ्रष्ट झाली असून त्यांच्या विधानाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घ्यावी, अशा शब्दात विनायक राऊत यांनी रावसाहेब दानवेंना लक्ष्य केलं. 

रत्नागिरी : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी हे सांड तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम करणारे बैल असल्याचं विधान केलं होतं. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना उदाहरण देत असल्याचं सांगितलं होतं. त्यांच्या या विधानानंतर काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं. तर, त्याच वेळी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी रावसाहेब दानवे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. रत्नागिरी येथे त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी हे उत्तर दिलं. दरम्यान, भाजपच्या नेत्यांना सत्तेची मस्ती आली असून त्यातून त्यांची विकृती दिसून येते. दानवे गुरूजींची बुद्धी भ्रष्ट झाली असून त्यांच्या विधानाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घ्यावी, अशा शब्दात त्यांनी यावेळी रावसाहेब दानवेंना लक्ष्य केलं आहे. 

'काल, आज, उद्या शिवसेनाच'

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहे. पण, यावेळी त्याचा कोणताही परिणाम शिवसेनेवर होणार नाही. नारायण राणे यांच्या शक्ती प्रदर्शनाला काहीही अर्थ नाही. उलट राणे कोकणात तिसऱ्या लाटेला आमंत्रण देत आहेत. अशा रितीनं आशीर्वाद यात्रा काढून कोकणात शिवसेनेला कोणताही फटका बसणार नाही. कोकणात काल देखील शिवसेना होती. आज देखील आहे. तसेच ती उद्या देखील राहणार असं म्हणत त्यांनी राणेंच्या यात्रेला गंभीरपणे घेण्याचं कारण नसल्याचं म्हटलं आहे.

बाटगा नेहमी कोडगा, राणेंवर टिका

तसेच विनायक राऊत यावेळी नारायण राणे यांच्यावर देखील टीकेचे बाण सोडले आहेत. बाडगा हा नेहमी कोडगा असतो. राणेंकडून मंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी केली जात आहे. सत्तेसाठी द्रोह करणं हा राणेंचा स्थायीभाव आहे. राणेंनी सत्तेसाठी लाचार होत द्रोह केला असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे खंबीर खांब असल्याचं म्हटलं आहे. एकनाथ शिंदे नाराज असून त्यांना प्रत्येक फाईलवर सही करण्यासाठी 'मातोश्री'ची परवानही घ्यावी लागते. भाजपमध्ये आल्यास त्याचं स्वागत असल्याच्या राणेंच्या विधानावर प्रश्न विचारले असता त्यांनी अशा शब्दात राणेंना उत्तर दिलं आहे. 

'भाजपनं अंतर्गत नाराजी पाहावी' 

एकनाथ शिंदे यांच्यावर बोलताना भाजमधून एकनाथ शिंदे का बाहेर गेले? पंकजा मुंंडे यांचं काय? असा सवाल करत त्यांनी भाजपमधील नाराजीकडे देखील अंगुली निर्देश केले. शिवाय, केंद्रीय नेतृत्वानं नारायण राणे यांना देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावर आणून बसवले आहे असं देखील म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
Pune Umesh Appa Tagunde Baba Marathi News: शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Embed widget