देवेंद्र फडणवीसांना माझा शब्द, गोव्यात कितीही नोटा टाका, तुमच्या नोटांशी आम्ही लढू : संजय राऊत
Shivsena MP Sanjay Raut : महाराष्ट्राप्रमाणे गोव्यात आम्ही जनमत विकू देणार नाही, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर बोलताना संजय राऊतांनी त्यांच्यावर पलटवार केलाय.
Shivsena MP Sanjay Raut : आगामी गोवा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यासोबतच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसंदर्भातही त्यांनी वक्तव्य केलं आहे. उत्तर प्रदेशात सत्तांतर अटळ आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
महाराष्ट्राप्रमाणे गोव्यात आम्ही जनमत विकू देणार नाही, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातून गोव्यात गेलेत. ते तिथे गेल्यानंतर आपण पाहिलंच असे की, भारतीय जनता पक्षही फुटला. काल एका मंत्र्यांनी पक्षाचा त्याग केला. भाजप आमदार प्रवीण झाटे यांनी देखील पक्ष सोडला. त्यामुळे त्यांनी आधी पक्षांतर्गत सुरु असलेलं युद्ध सुरुये, ते पाहावं. प्रश्न नोटांचा म्हणत आहेत ते अगदी बरोबर आहे. आमची लढाई गोव्यात नोटांशीच आहे. भाजपची लोकं ज्याप्रकारे निवडणूकीत नोटांचा पाऊस पाडत आहेत. विशेषतः महाराष्ट्रातून ज्या काही नोटांच्या बॅगा चाललेल्या आहेत, त्यामुळे शिवसेनेसारखा पक्ष गोव्यात त्या नोटांशी नक्की लढेल, गोव्यातील जनतेला हे सांगण्याचा प्रयत्न करेल, या नोटांच्या दबावाखाली येऊ नका. शिवसेना हा सामान्यांचा, बहुजनांचा पक्ष आहे. हिंदुत्ववादी हा या नोटांना पुरुन उरेल हे नक्की. देवेंद्र फडणवीसांना माझा शब्द आहे, तुम्ही कितीही नोटा टाका, तुमच्या नोटांशी आम्ही लढू"
पाहा व्हिडीओ : टेकाड्यांची तुलना सह्याद्री किंवा हिमालयाशी करता येणार नाही : संजय राऊत
सत्तेत येणाऱ्या पक्षांना कधी गळती लागत नाही : संजय राऊत
उत्तर प्रदेशात भाजपामधून काही नेते बाहेर पडल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "भाजपामध्ये लागलेली गळती ही सुरुवात आहे. ओपिनियन पोलनुसार, भाजपा पुन्हा एकदा सत्तेवर येईल असं सांगितलं जात आहे, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. सत्तेत येणाऱ्या पक्षांना कधी गळती लागत नाही. मंत्री, आमदार, प्रमुख कार्यकर्ते पक्ष सोडत नाहीत. त्यामुळे उत्तर प्रदेशचा प्रवास हा राजकीय परिवर्तनाच्या दिशेने सुरू आहे याची खात्री आहे."
देवेंद्र फडणवीसांसोबतच मुख्यमंत्री कधी घराबाहेर पडतील? असा सवाल विचारणाऱ्या चंद्रकांत पाटलांनाही संजय राऊतांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, "त्यांना योग्य वेळी माहिती देऊ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम उत्तम सुरू आहे. येत्या 13 तारखेला पंतप्रधानांसोबत होणाऱ्या बैठकीत ते सहभागी होतील. शरद पवार यांच्याइतकी राजकारणाची, समाजकारणाची आणि व्यक्तिमत्वाची उंची आधी गाठा. तुमच्यासारखी जी टेकाडं आहेत, त्यांना सह्याद्री किंवा हिमालयाच्या उंचीशी स्पर्धा करता येणार नाही. पंतप्रधान पदावर एखादा माणूस बसला म्हणून तो मोठा होत नाही. पंडित नेहरु, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री यांची उंची मोठीच होती. अनेकदा अनेक व्यक्ती त्या पदावर पोहोचू शकल्या नाहीत तरी त्यांची उंची कमी होत नाही."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Brain Fog : ओमायक्रॉनमुक्त झालेल्यांना 'ब्रेन फॉग'चा धोका; लक्षणं आणि कारणं काय?
- कोरोनाच्या उपचारात 'मोलनुपिरावीर' औषधाचा समावेश नाही : ICMR
- Omicron Symptoms: लहान मुलं आणि तरूणांमध्ये ओमिक्रॉनची लक्षणं वेगळी, कसं ओळखायचं? घ्या जाणून
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह