Omicron Symptoms: लहान मुलं आणि तरूणांमध्ये ओमिक्रॉनची लक्षणं वेगळी, कसं ओळखायचं? घ्या जाणून
Omicron Symptoms: ओमायक्रॉन आणि डेल्टा प्रकारांमुळं देशात संसर्ग झालेल्यांची संख्या झपाट्यानं वाढू लागलीय.
![Omicron Symptoms: लहान मुलं आणि तरूणांमध्ये ओमिक्रॉनची लक्षणं वेगळी, कसं ओळखायचं? घ्या जाणून Symptoms of Omicron are different in young children and adolescents, recognize them like this Omicron Symptoms: लहान मुलं आणि तरूणांमध्ये ओमिक्रॉनची लक्षणं वेगळी, कसं ओळखायचं? घ्या जाणून](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/07/3f2947fa594db817df67ff5d29adb054_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Omicron Symptoms: ओमायक्रॉन आणि डेल्टा प्रकारांमुळं देशात संसर्ग झालेल्यांची संख्या झपाट्यानं वाढू लागलीय. दरम्यान, लहान मुलांनाही ओमायक्रॉनचा संसर्ग होण्याचा धोका वाढलाय. बहुतेक लोकांमध्ये ओमायक्रॉनची एक सारखीच लक्षणं पाहायला मिळाली. परंतु, लहान मुलं आणि तरुणांमधील ओमायक्रॉनचे दोन वेगवेगळे लक्षण दिसून येत आहेत. लहान मुंल आणि तरुणांमध्ये दिसणारी ओमायक्रॉनची लक्षणं कोणती आहेत? याबद्दल जाणून घेऊयात.
लहान मुलांमध्ये घसा खवखवणे किंवा जळजळ होणे तसेच सर्दी खोकल्याचा त्रास होतो आणि त्यानंतर ताप येतो, अशी लक्षणे पाहायला मिळाली. बोलू शकणारी मुलं घसा खवखवण्याची तक्रार करतात. मात्र, ज्या मुलांना बोलता येत नाहीत, ते फक्त रडतात. यामुळं पालकांनी आपल्या मुलाच्या रडण्याकडं दुर्लक्ष न करता जवळच्या डॉक्टरांना दाखवणे योग्य ठरेल. दुसरीकडे, तरूणांना घशात जळजळ होते. त्यानंतर सर्दी आणि थंडीसह तीव्र तापाची समस्या जाणवते.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सीडीसी आणि डब्ल्यूएचओकडून वारंवार माहिती जारी केली जात आहे. तसेच नागरिकांनी आवश्यक नसल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं. मास्कचा नियमितपणे वापर करावा आणि सामजिक अंतर ठेवावं, असंही आवाहन केलं जातंय.
भारतात सोमवारी ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झालेल्या 4 हजार 33 रुग्णांची नोंद झाली. तर, 1 हजार 552 जणांनी ओमायक्रॉनवर मात केलीय. दरम्यान, महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत 1 हजार 216 ओमायक्रॉनबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यानंतर राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थानमध्ये आतापर्यंत 529 रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, दिल्लीतील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या आता 513 झाली आहे. ओमायक्रॉन संसर्गाच्या बाबतीत दिल्ली तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे.
हे देखील वाचा-
- Corona New Cases : कोरोना रुग्णांमध्ये 6.4 टक्क्यांची घट, 24 तासांत 1 लाख 68 हजार नवे कोरोनाबाधित
- India Corona Test Guidelines : ...तरच कोरोना चाचणी करा; आयसीएमआरची नवी नियमावली
- Omicron in India : तिसर्या लाटेचा कहर? ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या चार हजारांवर, पाहा तुमच्या राज्यातील परिस्थिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)