एक्स्प्लोर

महाराष्ट्रात आम्ही असेपर्यंत राजकीय प्रादुर्भाव होणार नाही, आम्ही फवारणीचे पंप घेऊन फिरत आहोत : संजय राऊत

साडे तीन महिन्यानंतर शिवसेनेचे सर्व खासदार एकत्र आले. प्रत्येक लोकप्रतिनिधीला आपल्या मतदारसंघातील अडचणी नेत्याने ऐकून घ्याव्या असं वाटत असतं. त्यासाठीच आजची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.

मुंबई : महाराष्ट्रात आम्ही असेपर्यंत राजकीय प्रादुर्भाव होणार नाही, आम्ही फवारणीचे पंप घेऊन फिरत आहोत. शिवसेना खासदारांच्या बैठकीनंतर नेते संजय राऊत यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

आज शिवसेनेच्या सर्व खासदारांची मुख्यमंत्र्यांसोबत वर्षा या निवासस्थानी बैठक पार पडली. सर्व खासदारांच्या मतदारसंघातील कोरोना प्रदूर्भावाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बैठक बोलावली असल्याचं नेते संजय राऊत यांनी बैठकीनंतर स्पष्ट केलं. तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील बैठकीशी आजच्या या बैठकीचा संबंध नसल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं.

आजच्या या बैठकीत राजकीय चर्चा झाली नसून राज्यात सरकारला कुठलाही धोका नसल्याचं संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं. राज्यात आम्ही असेपर्यंत राजकीय प्रादुर्भाव होणार नाही असा विश्वास व्यक्त करत त्यासाठी आम्ही फवारणीचे पंप घेऊन फिरत आहोत असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

खरंतर आज साडे तीन महिन्यानंतर शिवसेनेचे सर्व खासदार एकत्र आले. प्रत्येक लोकप्रतिनिधीला आपल्या मतदारसंघातील अडचणी नेत्याने ऐकून घ्याव्या असं वाटत असतं. त्यासाठीच आजची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.

या बैठकीला लोकसभा आणि राज्यसभेचे असे एकूण शिवसेनेचे 21 खासदार उपस्थितीत होते. प्रत्येक खासदाराच्या जिल्ह्यात अधिकाऱ्यांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात येत असलेल्या उपाय योजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच लॉकडाऊनमुळे उद्योग - व्यवसायांवर आणि शेतकऱ्यांवर होत असलेला परिणाम याबाबत चर्चा करण्यात आली. या परिस्थितीत केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीबाबतही खासदारांच्या भूमिकेबाबत मुख्यमंत्र्यांनी मतं जाणून घेतली. यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये समन्वय साधण्यासाठी आणि केंद्राने सुचवलेल्या मार्गदर्शक तत्वांची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यासंदर्भात खासदारांनी सक्रिय सहभाग घ्यावा याबाबत मुख्यमंत्र्यांकडून सूचना देण्यात आल्या.

मात्र सध्या राजस्थान मध्ये सुरू असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्शवभूमीवर आजची शिवसेनेच्या खासदारांची बैठक महत्वाची मानली जाते. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर आज खासदारांसोबत बैठक घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीचा कानोसा घेण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केल्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सर्व खासदारांना त्यांच्या मतदारसंघातली राजकीय हालचालींवर नजर ठेवण्याच्या सूचना ठाकरे यांनी दिल्याचं बोललं जातंय.

Devendra Fadnavis | हे सरकार पाडण्यात कुठलाही रस नाही, अमित शाहांसोबतची भेट राजकीय नाही - देवेंद्र फडणवीस

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
Chhatrapati Sambhajinagar: गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
Embed widget