एक्स्प्लोर

बोफोर्सप्रमाणे राफेलचा निर्णय जनतेच्या न्यायालयात होईल : संजय राऊत

राफेल घोटाळ्याबाबत राहुल गांधी यांनी तीन राज्यांच्या निवडणुकीत जे वादळ उभे केले होते. यात भाजपचा सपाटून पराभव झाला असून यास राफेलचा मुद्दाही तेवढाच महत्वाचा ठरल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

पंढरपूर : राफेल घोटाळ्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देण्यास नकार दिला हे योग्यच केले असून बोफोर्सप्रमाणे राफेलचा निर्णय देखील जनतेच्याच न्यायालयात होईल अशी  टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. राफेल घोटाळ्याबाबत राहुल गांधी यांनी तीन राज्यांच्या निवडणुकीत जे वादळ उभे केले होते. यात भाजपचा सपाटून पराभव झाला असून यास राफेलचा मुद्दाही तेवढाच महत्वाचा ठरल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. तीन राज्याच्या विजयानंतरही राहुल गांधी यांनी EVM मशीनवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.  जगभर या मशीन हद्दपार केल्या असताना आणि भाजप सोडून सर्वच पक्ष याला विरोध करत असताना याचा वापर करायचा का? याचा विचार करून निवडणूक आयोगाने निर्णय करावा, असे राऊत यांनी सांगितले. विजय मल्ल्याबाबत गडकरी यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार राऊत यांनी घेतला.  नितीन गडकरी हे आजारी असल्याने त्यांना मल्ल्याच्या कर्जाचे आकडे ठाऊक नसतील. त्यामुळे त्यांनी मल्ल्याला क्लीनचिट दिली असेल, असा टोला राऊत यांनी लगावला. ज्या पद्धतीने राफेलचा निर्णय देण्यात सर्वोच्य न्यायालयाने असमर्थता दाखवली. त्याच पद्धतीने राम मंदिराच्या बाबतीत न्यायालय निर्णय घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कायदे करणारे सभागृह आहे आणि त्याची फक्त अमंलबजावणी करण्याचे काम न्यायालयाचे असताना प्रत्येक गोष्टीत न्यायालय का टांग अडवतंय? असा सवालही राऊत यांनी केला. राहुल गांधी यांनी हिंदू कार्ड वापरायला सुरुवात केली आहे. ते मंदिरे फिरले त्यामुळे तीन राज्याच्या निवडणुकीत भाजपचा मोठा मतदार काँग्रेसकडे वळला. आम्ही राहुल गांधी यांना अयोध्येत येऊन राम लल्लाचे दर्शन करण्याचे आवाहन केल्याचे राऊत यांनी सांगितले. अयोध्येसाठी पंढरपूर येथून उद्धव ठाकरे 24 डिसेंबरला रणशिंग फुंकणार असून पंढरपूर हे कोट्यवधी गोर गरीब मजूर शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे आराध्य दैवत असल्याने पंढरपूरची निवड केल्याचे राऊत यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget