एक्स्प्लोर
LIVE: खा. रवींद्र गायकवाड यांची पत्रकारांसोबत बाचाबाची
नवी दिल्ली/मुंबई: एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चप्पलेनं मारहाण करणं शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांना चांगलं महागात पडलं आहे. कारण एअर इंडियाच्या तक्रारीनंतर गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. त्याआधी देशातल्या प्रमुख एअरलाईन्स कंपन्यांनी रवींद्र गायकवाड यांना काळ्या यादीत टाकत, त्यांच्या विमान प्रवासावर निर्बंध आणले आहेत.
त्यामुळं गायकवाडांना मुंबई गाठण्यासाठी ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसनं प्रवास करावा लागतो आहे. राजस्थानातील कोटा रेल्वे स्थानकावर पत्रकारांनी गायकवाडांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र गायकवाडांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. यावेळी रवींद्र गायकवाडांची पत्रकारांसोबत बाचाबाची देखील झाली. या प्रकरणावर उद्धव ठाकरे प्रतिक्रिया देतील असं रवींद्र गायकवाड म्हणालेत.
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेनं मारहाण करणाऱ्या रवींद्र गायकवाडांनी, अटक टाळण्यासाठी पुन्हा लपंडाव सुरू केल्याची चर्चा आहे. कारण विमान कंपन्यांनी ब्लॅक लिस्टेड केल्यानंतर, रवींद्र गायकवाड एका खासदाराचे सहकारी बनून ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसनं मुंबईसाठी रवाना झाले.
दरम्यान एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला विमानात मारहाण केल्याप्रकरणी रवींद्र गायकवडांविरोधात दिल्लीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एअर इंडियाच्या तक्रारीनंतर गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. त्याआधी देशातील सर्व विमानातून प्रवास करण्यास त्यांच्यावर बंदी घातली आहे.
खाजगी विमान सेवा, एअर इंडिया आणि फेडरेशन ऑफ इंडियन एअर लाईन्सनं गायकवाड यांना कोणत्याही विमानातून प्रवास करण्यास बंदी घातली आहे. आज त्यांनी विमाननं प्रवास करण्याची भाषा केली होती. मात्र गायकवाड येणार म्हणून दिल्ली विमानतळावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. त्यामुळे गायकवाड विमानतळाकडे फिरकलेच नाही. दरम्यान, रवी गायवाड यांनी एअर इंडियाविरुद्द तक्रार दिली. त्यात त्यांनी धक्काबुक्की केल्याचं म्हटलं आहे.
शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीनंतर आता तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
LIVE UPDATE
- खासदार रवींद्र गायकवाड यांची एअर इंडियाविरोधात दिल्ली पोलिसात तक्रार दाखल
- खासदार रवींद्र गायकवाड यांना इंडिगोनेही तिकीट नाकारलं, संध्या. 5 च्या विमानाचं तिकीट रद्द
- खासदार रवींद्र गायकवाड दिल्लीहून पुण्याकडे येणार, दिल्ली विमानतळावर बंदोबस्तासाठी पोलीसांचा फौजफाटा
- एअर इंडियाकडून शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांचं विमान तिकीट रद्द करण्यात आलं आहे. गायकवाड हे आज दुपारी एअर इंडियाच्या विमानाने पुण्याला जाणार होते. मात्र एअर इंडियाने त्यांचं तिकीट रद्द केलं आहे. गायकवाड यांनी एअर इंडियाच्या तिकीटानेच पुण्याला जाणार असं सांगितलं होतं. मात्र आता एअर इंडियाने त्यांना तिकीट देण्यास नकार दिला आहे.
- खासदार रवींद्र गायकवाडांनी हिंसक होणं अयोग्य, कोणाची चूक हे पाहावं लागेल. उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेतील. - एकनाथ शिंदे, शिवसेना नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री
- तुळजापूरमध्ये खासदार रवींद्र गायकवाडांच्या समर्थनार्थ शिवसेनेचं आंदोलन. तालुका अध्यक्षांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा पुतळा जाळला
- खासदार रवींद्र गायकवाड यांची एअर इंडियाविरोधात तक्रार, नागरी उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
- आपल्याकडे एअर इंडियाच्या तिकीट असून एअर इंडियाच्या विमानातूनच प्रवास करणार असल्याचं रवींद्र गायकवाडांनी स्पष्ट केलंय. तसंच मोदींचा एकेरी उल्लेख केल्यामुळंच आपण मारहाण केल्याचा दावा गायकवाडांनी केलाय.
- भारतीय विमान संघानं गायकवाडांवर बंदी घातली आहे. जवळपास भारतातील सर्व विमान कंपन्यांनी गायकवाडांवर बंदी घातली आहे. मात्र आपण दुपारी एअर इंडियाच्याच विमानानं पुण्यात परतणार असून आपल्याला कोण अडवणार हे पाहू अशी मुजोर प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
- शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी त्यांचं स्पष्टीकरण शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांच्याकडे दिलं आहे. काल शिवेसेना पक्षाकडून खासदार रवींद्र गायकवाड यांना अधिकृत जाब विचारण्यात आला होता. दिल्ली विमानतळावर एअर इंडिया विमानात घडलेल्या प्रकाराबद्दल खासदार रवींद्र गायकवाड यांनी त्यांची बाजू शिवसेना पक्षाकडे मांडली आहे. पक्षाने त्यांना या घटनेसंदर्भात समज दिलेली आहे.
पुन्हा त्याच विमानाने जाणार, एअर इंडियाने अडवून दाखवावं : गायकवाड
एअर इंडियाकडून खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विरोधात तक्रार
... म्हणून मी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला 25 सँडल मारले : रवींद्र गायकवाड
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement