एक्स्प्लोर

कर्जमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडून मदत घ्यावी, शिवसेना मंत्र्यांची मागणी

मुंबई: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेच्या मंत्र्यांनी आज मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी आपली भूमिका मांडली. ‘जोवर कर्जमुक्तीबाबत निर्णय होत नाही तोवर सभागृहाचं कामकाज पुढं जाणार नाही.’ असं सेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे सांगितलं. शिवसेनेच्या या मागणीनंतर मुख्यमंत्री म्हणाले की, ‘आपल्याला कर्जमुक्तीसाठी केंद्राची गरज लागणार आहे.’ दरम्यान, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पंतप्रधान मोदींची भेट घ्यावी आणि त्यांचाशी चर्चा करुन याबाबत मुख्यमंत्र्यांनी निवेदन करावं अशी मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी निवेदन करुन सरकारची भूमिका स्पष्ट करावी. निवेदन केल्यानंतर सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होईल. अशी भूमिका आम्ही घेतली आहे.’ अशी माहिती शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते यांनी बैठकीनंतर दिली. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस उद्या किंवा परवा पंतप्रधानांना भेटणार असल्याचंही रावते म्हणाले. या बैठकीआधी शिवसेनेच्या मंत्र्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत कर्जमाफीसंदर्भात चर्चा केली. त्यानंतर दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, रामदास कदम, सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. सभागृहाचे कामकाज चालावे आणि शेतकऱ्यांचा प्रश्नदेखील सुटावा अशी भूमिका शिवसेनेची असल्याचं रामदास कदम यांनी सांगितलं. एकीकडे शिवेसेना मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरु असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची संसदेतल्या पंतप्रधान कार्यालयात 15 ते 20 मिनिटं चर्चा झाली. मात्र, ही चर्चा नेमकी कशाबाबत झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. राज्यात शेतकरी कर्जमाफीसाठी 22 हजार कोटींची गरज उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत कर्जमाफीची घोषणा केल्यानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आपल्यालाही कर्जमाफी मिळेल, अशी आस लागली आहे. 4 लाख कोटींचा कर्जाचा भार वाहणाऱ्या राज्य सरकारनेही कर्जमाफीसाठी किती पैसे लागतील, याची माहिती मागवली. एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची म्हटल्यास राज्य सरकारच्या तिजोरीत 22 हजार 500 कोटी रुपयांची गरज आहे. मागचा घोळ लक्षात घेता, कर्जमाफी द्यायचीच झाली तर शेतकऱ्यांच्या वैयक्तिक खात्यावर पैसे जमा करण्याची सरकारची भूमिका आहे. दरवर्षी 60 टक्के पीक कर्जाची परतफेड होत नाही ! 35 जिल्ह्यांमधील 33 लाख शेतकऱ्यांनी सरासरी 10 हजार 255 कोटींचे पीक कर्ज सहकारी संस्थांकडून घेतलं आहे. विविध कारणांमुळे दरवर्षी 60 टक्के पीक कर्जाची परतफेड होत नाही. कर्जफेड न करणाऱ्या शेतकर्‍यांना पुन्हा पीक कर्ज मिळत नाही. कर्जमाफीसाठी 22,500 कोटींची गरज सध्या राज्यातल्या 14 लाख शेतकऱ्यांकडे सहकरी संस्थांचे 9 हजार 500 कोटी आणि राष्ट्रीयकृत बँकांचे 13 हजार कोटी कर्ज थकले आहे. फडणवीसांना कर्जमाफीसाठी 22 हजार 500 कोटींची गरज आहे. संबंधित बातम्या: राज्यात शेतकरी कर्जमाफीसाठी 22 हजार कोटींची गरज पवार-मोदींची संसदेतल्या पंतप्रधान कार्यालयात 20 मिनिटे चर्चा

महत्त्वाच्या बातम्या

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  

व्हिडीओ

Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget