केंद्रात तुमचं सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करुन दाखवा, माझं सरकार नसतानाही मी कर्जमाफी केली : उद्धव ठाकरे
राज्य सरकारने जाहीर केलेल्या योजना या निवडणुकीत पाप लपवण्यासाठी आणल्या असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केले.
Uddhav Thackeray : केंद्रात माझं सरकार नसताना मी शेतकऱ्यांची (Farmers) कर्जमाफी केली. आता केंद्रात तुमचं सरकार आहे, तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करा असे मत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही. त्याच्या सर्व खते बी बियाणे यावर जीएसटी लावायचा. त्याची पिळवणू करायची. हक्काचे द्यायचे नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला.
जाहीर केलेल्या योजना या निवडणुकीत पाप लपवण्यासाठी
राज्य सरकारने जाहीर केलेल्या योजना या निवडणुकीत पाप लपवण्यासाठी आणल्या असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. नुसतं वीज बील माफ करु नका थकबाकी माफ करुन वीज बील माफ करा असे उद्धव ठाकरे म्हणाले. ही थकबाकी याच अधिवेशनात करा असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेना चोरुन तुम्ही विजय मिळवला
शिवसेना चोरुन तुम्ही विजय मिळवला आहे. तुम्ही आमचा धनुष्यबाण चोरला असल्याचे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार प्रहार केला. माझ्या वडिलांचा फोटो चोरुन, त्यांचा फोटो दाखवून तुम्ही विजयी झाला आहात असेही उद्धव ठाकरे म्हणाले. आपल्या बाबतीत जो खेळ केला तोच खेळ त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर केल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत टाकलं आहे. त्यानंतर त्यांच्या फोटोचा वापर कोणीही करु शकतो असते उद्धव ठाकरे म्हणाले. सगळ कपटकाररस्थान भाजपने केल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
मशाल घेऊन गावा गावात जा आणि यांची पाप खुशाल जाळून टाका
मशाल घेऊन गावा गावात जा आणि यांची पाप खुशाल जाळून टाका असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. मी मुख्यमंत्री असताना शहरातील गुंठेवारीचा प्रश्न सोडवला, समांतरल जलवाहीनीचा प्रश्न सोडवला, रस्त्यांची कामे केल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
आपल्या हक्कासाठी मागण्यांसाठी एकत्र या
कृपा करुन ऐकमेकात भांडू नका, सगळेजण एकत्र या असे आवाहन उद्धव ठाकरेंनी जरांगे पाटील यांच्यासह सर्वच जात धर्माच्या लोकांना केलं. आपल्या भारतीय संघाच्या स्वागतासाठी मुंबईत लाखो लोक रस्त्यावर आले. विजयोत्सव साजरा करण्यासाठी जर लाखो लोक एकत्र येत असतील तर आपल्या हक्कासाठी मागण्यांसाठी आपण एकत्र येऊन यांनी खाली आणू शकतो असे उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं प्रथमच जाहीर भाष्य