काहीजण आपला वापर करुन दिल्लीत बसले, मशालीने त्यांच्या बुडाला आग लावू, ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
आपलीच मुंबई (Mumbai) आपल्याला उपरी होतेय, कारण दोन महाराष्ट्र द्वेष्टे दिल्लीत बसले आहेत, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपच्या नेत्यांवर टीका केली.
Uddhav Thackeray : आपलाच वापर करुन आपल्याच खांद्यावर चढून दोन महाराष्ट्र द्वेष्टे दिल्लीत बसले आहेत, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह गहृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. मी व्यंगचित्र काढत नाही पण शब्दाने बोलतो. आपलाच वापर करुन आपल्याच खांद्यावर चढून हे महाराष्ट्रद्वेष्टे दिल्लीत बसले आहे. आज आपल्याला लाथा घालण्याची भाषा करत आहेत. यांचं तंगड पकडून बाजूला फेकायचं की नाही? अशावेळी मशालीची धग यांच्या बुडाला लावायचे की नाही? असा सवाल करत ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली. काही लोक आपला वापर करुन दिल्लीत बसलेत. मशालीने त्यांच्या बुडाला आग लावू असंही ठाकरे म्हणाले.
मार्मिकच्या 64 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. वय सगळ्यांचं वाढते. माणूस मनाने थकतो तेव्हा तो वयस्कर होतो असंही ठाकरे म्हणाले. सामना, मार्मिक, शिवसेना हा एक चमत्कार आहे. बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे यांनी मार्मिक सुरु केल्याचे ठाकरे म्हणाले. मार्मिकचा आणि माझा जन्म एकाच साली झाला आहे. आपण सगळे संकटात साथ देत आहात म्हणून मी शत्रूची परवा करत नाही असेही ठाकरे म्हणाले. आता कुंचल्याची याची मशाल झाली आहे. काही लोक आपला वापर करून दिल्लीत बसलेत. मशालीने त्यांच्या बुडाला आग लावू असंही ठाकरे म्हणाले. मराठी माणसांसाठी कानाखाली आवाज काढला तेव्हा एअर इंडिया मध्ये मराठी माणूस दिसू लागला असे ठाकरे म्हणाले.
आज कुंचल्याची मशाल झालीय
मुंबई लढून आपण मिळवली, पण मुंबईत मराठी माणूस हद्दपार होतोय. नोकरी मिळत नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. वर्गणीदार आमच्याकडे जास्त म्हणून मार्मिक आमचा असं होऊ शकतं, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसेना शिंदे गटावर नाव न घेता टीका केली. आज कुंचल्याची मशाल झाली आहे. या मशालीची धग महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या बुडाला लावू असे ठाकरे म्हणाले. सामना आणि मार्मिक हा खणखणीत आवाज असल्याचे ठाकरे म्हणाले. माझ्यापेक्षा मोठे असलेले, बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम अनेकजण मला नेते माणतात हे माझं भाग्य समजतो. कोणत्याही प्रकारे वयाचं अंतर ठेवत नसल्याचे ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
ऐन विधानसभेच्या तोंडावर ठाकरे गटात नाराजी? नाराज पदाधिकाऱ्यांना डावलून कुर्ल्यातील नव्या नियुक्त्या जाहीर