4 जूनला सरकार बदलणार, फडणवीसांना हिमालयात जावं लागणार, संजय राऊतांचा हल्लाबोल
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना हिमालयात जाऊन यज्ञाला बसावच लागणार आहे. त्यांना केदारनाथला जाऊन पुजाअर्चा घंटा बडवावीच लागेल असे म्हणत खासदार संजय राऊतांनी फडणवीसांवर टीका केली.
Sanjay Raut : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना हिमालयात जाऊन यज्ञाला बसावच लागणार आहे किंवा केदारनाथला जाऊन त्यांना पुजाअर्चेची तयारी करावी लागणार आहे. कारण, त्यांचे राज्य आता जाणार असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार टीका केली. राऊत यांनी आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. दरम्यान, 4 जूनला देशातील सरकार बदलणार असल्याचा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला. दरम्यान, 4 जूनला देशातील सरकार बदलणार असल्याचा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला.
विरोधी पक्षाच्या नेत्यांना धमकावलं जातंय
येत्या 4 जूनला देशातील सरकार बदलणार आहे. तरीदेखील या सरकारची मस्ती जात नाही, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर जोरदार टीका केली. आजही विरोधी पक्षाच्या नेत्यांना धमकावलं जात आहे. हे फक्त दिल्लीत नसून मुंबईही होत असल्याचे राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी नको हे सांगायला अजित पवार, तटकरे आणि वळसे पाटील आले होते
दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील जोरदार टीका केली. 2019 साली ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी नको, आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही हे सांगायला सर्वात आधी सुनील तटकरे अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील होते असा दावा संजय राऊतांनी केला आहे. त्यांचं म्हणणं होतं आम्ही सिनियर आहोत, आम्ही ज्यूनियर माणसाच्या हाताखाली काम करणार नाही असे राऊत म्हणाले.
2019 ला सुद्धा शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन वाद झाला होता
तेव्हा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी आम्ही एकनाथ शिंदेंची निवड केली होती. शिवसेनेकडून आम्ही त्यांचं नाव पुढे केलं होतं असेही संजय राऊत म्हणाले. परंतू, भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला निरोप पाठवलेला होता. दिल्लीचा निर्णय काय येईल, तो आम्हाला माहिती नाही. परंतू आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून चालणार नाहीत असा दावाही राऊतांनी केला. ही भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांची तेव्हा भूमिका होती असे राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा