Shivsena Dasara Melava : आम्हाला गद्दार म्हणता, मग आमच्यासोबत लव्ह मॅरेज करणाऱ्या अजित पवारांना काय म्हणणार? गुलाबराव पाटलांचा ठाकरे गटाला सवाल
Eknath Shinde Dasara Melava : मुंबईतील आझाद मैदानावर शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्यात बोलताना माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
Gulabrao Patil Dasara Melava 2023 : आज बरेच लोक आम्हाला गद्दार म्हणत आहेत. पण आमच्यासोबत लव्ह मॅरेज करणाऱ्या अजित पवार यांच्याबद्दल तुम्ही काय बोलणार असे म्हणत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठी मदत सरकारनं केली आहे. महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे गेले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल 300 रुपेय दिले तरी संजय राऊत नावाचे मशीन म्हणते सरकार काही करत नाही.
50 लोकांनी देशात इतिहास लिहलाय
मुंबईतील आझाद मैदानात शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळावा आयोजीत केला आहे. या मेळ्याव्यात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी पाटील यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. घरामध्ये बसून काही होत नाही, मैदानात उतरावे लागते असे गुलाबराव पाटील म्हणाले. ५० लोकांनी देशात इतिहास लिहलाय. बाळासाहेब ठाकरेंनी आवाज दिला की महाराष्ट्र बंद व्हायचा, त्यांचे मावळे आम्ही आहोत असे पाटील म्हणाले.
शिवसेना शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर सुरु आहे. त्यासाठी राज्यभरातून विशेष वाहनांची सोय करण्यात आली असून या मेळाव्यासाठी सव्वा लाख खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. या दसऱ्या मेळाव्यात एकनाथ शिंदे काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटाची तयारी
दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या (Shivsena Dasara Melava) दोन्ही गटाची जय्यत तयारी झाली आहे. शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंचा आवाज घुमणार तर आझाद मैदानावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) तोफ धडाडणार आहे. आझाद मैदानावरील दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांची गर्दी झाली आहे. शिवसैनिकांना आत सोडलं जात असून पोलिसांकडून प्रत्येकाची तपासणी केली जात आहे. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुसरीकडे आझाद मैदानावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा असणार आहे. शिवसेनेत दोन गट पडल्याने आता कार्यकर्ते आपापल्या नेत्याचं भाषण ऐकण्यासाठी रवाना झालेत. मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक येण्यास सुरुवात झालीय.
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात गेल्या वर्षीप्रमाणं बाळासाहेबांची खुर्ची मंचावर ठेवली जाणार आहे. याच खुर्ची वरून बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्यात 2012 साली शेवटचे भाषण केले होते. ती खुर्ची आठवण म्हणून ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे कलादालनात ठेवण्यात आली होती. गेल्यावर्षी एम एम आर डी ए मैदानात झालेल्या दसरा मेळाव्यात हीच खुर्ची ठेवण्यात आली होती. याहीवर्षी बाळासाहेबांची आठवण म्हणून ही खुर्ची ठेवली जाणार. शिवसैनिकांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला जाणार. महत्त्वाचे म्हणजे याच खुर्चीत बसून बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या उद्धवला सांभाळा असे भावनिक आवाहन शिवसैनिकांकडे केले होते.