एक्स्प्लोर
शिवसेना-काँग्रेस एकत्र आली तरी सत्ता स्थापन होणार नाही : सुधीर मुनगंटीवार
सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस उत्सुक असल्याची चर्चा आहे. काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी प्रस्ताव आल्यास शिवसेनेला पाठिंबा द्यावा ही भूमिका घेतली आहे.
मुंबई : काँग्रेस आणि शिवसेना कधीच एकत्र येणार नाहीत. एकत्र आले तरी सत्ता स्थापन होणार नाही, असं वक्तव्य भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. तसंच 6 नोव्हेंबर आधी सत्ता स्थापनेची कोंडी फुटून मित्रपक्षांसह महायुतीची सत्ता स्थापन होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्यातील सत्तास्थापने मुद्द्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी एबीपी माझासोबत एक्स्लुझिव्ह बाततीच केली.
6 नोव्हेंबर आधी सत्ता स्थापनेची कोंडी फुटेल अशी अपेक्षा आहे. मित्रपक्षांसह महायुतीची सत्ता स्थापन होईल. 6 किंवा 7 नोव्हेंबरला शपथविधी होईल, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. तसंच शिवसेनेसोबतच सत्ता स्थापन करण्याचं आमच्या मनात असल्याचंही त्यांनी सांगितलं.
काँग्रेस शिवसेना कधीच एकत्र येणार नाहीत
सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस उत्सुक असल्याची चर्चा आहे. तर संजय राऊत यांनीही शिवसेना एकटी सत्ता स्थापन करु शकते असं वक्तव्य केलं आहे. यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "कोणत्याही पक्षाने प्रयत्न केला तर सरकार स्थापन होऊ शकतं. संजय राऊत यांचं वक्तव्य हे 2019 च्या संदर्भात नसावं. कारण काँग्रेस आणि शिवसेनेचे विचार जुळत नाहीत. दूध आणि लिंबू एकत्र येऊ शकत नाही. दूध आणि साखर एकत्र येतात. शेर कभी घास नहीं खाता."
काँग्रेस पाठिंबा देणार नाही, शिवसेना पाठिंबा घेणार नाही. काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आली तरी सत्ता स्थापन होणार नाही. एकत्र आले तरी त्यांच्या जागा 110 होतात. त्यांच्या एकत्र येण्याला आमचा नाही जनतेचा विरोध आहे. तर राष्ट्रवादीने विरोधी पक्षात बसण्याची त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
संबंधित बातम्या
काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा द्यावा; हुसेन दलवाई यांचं सोनिया गांधींना पत्र
संविधानातील तरतूद सांगितली तर राग का?
वेळेत सत्ता स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. राष्ट्रपती राजवटीबाबतचं वक्तव्य लोकशाहीविरोधी असल्याचं त्यांनी म्हटलं. तसंच आता ईडी चौकशीची नाही तर राष्ट्रपती राजवटीची धमकी दिली जात आहे, असा आरोपही केला होता. तर राष्ट्रपती तुमच्या खिशात आहेत का, असा सवाल 'सामना'च्या अग्रलेखातून विचारण्यात आला होता. याविषयी सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "राष्ट्रपती राजवटीबाबतचं विधान फक्त माहिती होती." "संविधानातील तरतूद सांगणं यात अडचण काय? त्याचा एवढा राग कशाला? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
शिवसेना-भाजपचं गोत्र सारखं
शिवसेनेची मनधरणी करण्याचा भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरु आहे. परंतु मुख्यमंत्र्यांच्या फोनला मातोश्रीवरुन प्रतिसाद मिळाल्याने भाजपमध्ये अस्वस्थता असल्याचं कळतं. याबद्दल सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "शिवसेनेच्या सहकारी मंत्र्यांसोबत माझी वैयक्तिक बातचीत होते. चर्चेतून, संवादातून प्रश्न मार्गी लागेल. शिवसेना आणि भाजपचं गोत्र सारखं आहे, स्वभाव सारखा आहे, त्यामुळे युती झाली आहे. शिवसेनेसोबतच सत्ता स्थापन करण्याचं आमच्या मनात आहे. जनादेशाचा सन्मान केला पाहिजे."
'सामना'तील टीकेचं उत्तर टीकने दिलं नाही!
स'सामना'मध्ये आमच्याबद्दल अतिशय वाईट भाषेत अग्रलेख लिहिले, पण आम्हीही राग मानायचं का? पण तो विचार केला नाही. राग मनात ठेवला असता तर कधीच युती झाली नसती. सामनातून केलेल्या टीकेचं कधीच टीकेने दिलं नाही. प्रेमाने सगळं जिंकता येतं, असं उत्तर सुधीर मुनगंटीवार यांनी 'सामना'तील टीकेवर दिलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
Advertisement