एक्स्प्लोर

शिवसेना आणि भाजपात सगळं समसमान पाहिजे, उद्धव ठाकरेंचं सूचक विधान

मी कार्यक्रमाबद्दल बोलतोय असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. पण त्यांचा अप्रत्यक्ष इशारा सत्तेतल्या समसमान वाट्याकडे आहे, हे उपस्थित कार्यकर्त्यांना कळायला वेळ लागला नाही.

मुंबई : भाजप आणि शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर दावा केला जात असतानाच शिवसेनेच्या 53 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर आले. या दोन्ही नेत्यांनी आपआपल्या भाषणात सूचक विधानं केली. आपल्या भाषणाच्या शेवटी उद्धव ठाकरे यांनी हे विधान केल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. मी कार्यक्रमाबद्दल बोलतोय असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. पण त्यांचा अप्रत्यक्ष इशारा सत्तेतल्या समसमान वाट्याकडे आहे, हे उपस्थित कार्यकर्त्यांना कळायला वेळ लागला नाही. एका युतीची पुढची गोष्ट महाराष्ट्राच्या व्यासपीठावर असून संपूर्ण देश बघतोय असेही उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेना आणि भाजपाचं ठरलं असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. वाघाच्या जबड्यात घालूनी हात म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची भाषा आज बदलली होती. वाघ आणि सिंह एकत्र आले तर जंगलात त्यांचीच सत्ता असते असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर शिवसेना आणि भाजपात सगळं समसमान पाहिजे, असं सूचक विधान उद्धव ठाकरेंनी केलं. मुख्यमंत्रिपदावर सेनेचाही 50 टक्के हक्क आहे असं तर उद्धव ठाकरेंना सूचवायचं नव्हतं ना? अशी आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. वाघ सिंहाची जोडी एकत्र आल्यावर कुणी राज्य करावं हे सांगावं लागत नाही : मुख्यमंत्री आम्ही युती केली तेव्हा सगळ्या गोष्टींचा विचार करून केली होती. आमचं ठरलंय, तुम्ही चिंता करू नका, असे  वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. युती करण्याची भावना महत्वाची आहे. देशात अनेक राज्यात युती आणि आघाडी झाली. मात्र आज त्यांची अवस्था काय आहे हे समोर आहे, असे ते म्हणाले. राजकारणासाठी विरोधकांच्या आघाड्या होतात, मात्र आपण आता एकसाथ दौडायचे आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. लोकसभेच्या विजयानंतर शिवसेनेचेच नव्हे तर भाजपचे खासदार देखील भेटायला आले होते. हा एकोपा असला पाहिजे. आपण एकमेकांत लढून सोन्याची माती करतो, आता ही माती होऊन द्यायची नाही, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेनेचे मंत्री आणि खासदार उपस्थित होते. यावेळी ठाकरे म्हणाले की,  संघर्षाच्या वेळेला मला शिवसेनाप्रमुखांची आठवण येत नाही कारण त्यांनी मला असे सवंगडी दिले आहेत. मात्र अशा आनंदाच्या क्षणी शिवसेनाप्रमुखांची आठवण येते. त्या सर्व शिवसैनिकांची आठवण येते ज्यांनी शिवसेना मोठी केली. ते म्हणाले की, शिवसैनिक प्रेम केलं तर भरभरून प्रेम करतो आणि लढायचं म्हटलं तर जीवाची बाजी लावून लढतो. ठाकरे यावेळी म्हणाले की, युती करण्याची भावना महत्वाची आहे. राजकारणासाठी विरोधकांच्या आघाड्या होतात. मात्र आता आपण आता एकसाथ दौडू, आपण संघर्ष केल्याने विरोधकांचं फावलं असल्याचं ठाकरे म्हणाले. यावेळी अनेक नेत्यांच्या भाजप प्रवेशावर ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांकडे अशी काय शक्ती आहे काही माहिती नाही. आम्ही विरोधी पक्षात उतरणार होतो तर आम्ही तुमच्यासोबत आलो. राधाकृष्ण विखे विरोधी पक्ष नेते होते तर ते देखील भाजपमध्ये आले. आता विरोधी पक्षनेते कुणाला तरी केलं आहे, तर त्यांना भाजपत घेऊ नका असे अजित पवारांनी सांगितलं आहे, असे ठाकरे म्हणाले. सगळ्यांना घ्या फक्त पवार कंपनी तिथेच राहू द्या, त्यांना घेऊ नका, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान होण्यात शिवसेनेचा मोठा वाटा आहे. याचा मला आनंद आहे. आपण जिंकलो याचा सर्वाधिक आनंद आहे. मला दुसऱ्यांच्या पराभवानंतर आनंद साजरा करायला आवडत नाही. मात्र सावरकरांना डरफोक म्हणणाऱ्यांना हरवलं यांचा आनंद आहे, असे ते म्हणाले. ओवेसी म्हणतो आम्ही या देशात भाडेकरू नाही. आम्ही समान भागीदार आहोत, तर वन्दे मातरम् म्हणायला लाज का वाटते. एवढं स्वातंत्र्य देऊनही तुमच्या मनातले किडे का वळवळतात?, असा सवाल ठाकरेंनी केला. मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमाला बोलावलं तर तुमच्या पोटात का दुखतंय, असा टोलाही ठाकरेंनी लगावला.  याआधीही ही परंपरा होती. भाजपचा अधिवेशनात शिवसेना प्रमुखांना आमंत्रित केलं होतं. तसेच अनेक भाजप नेत्यांनीही शिवसेनेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मध्यंतरी परंपरा खंडित झाली होती. मात्र  मधल्या काळातला दुरावा आता पूर्ण नाहीसा झाला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Embed widget