एक्स्प्लोर
Advertisement
मी खलनायक असेन तर उदयनराजे प्रेम चोप्रा: शिवेंद्रराजे भोसले
उदयनराजे भोसले यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेऊन, शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर तुफान टीका केली होती. त्याला शिवेंद्रराजेंनी उत्तर दिलं.
सातारा: “टीका करायला मुद्दे नसले की लोक वैयक्तिक पातळीवर येतात. ते मला खलनायक बोलले, ठिक आहे. मला खलनायकाची भूमिका घ्यायला का लागली? तुमचं राजकारण हे प्रेम चोप्रासारखं आहे. शेवटी प्रेम चोप्राला उत्तर द्यायला पाहिजे. मी अमोल पालेकरांची भूमिका घेऊ शकत नाही”, असा पलटवार साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर केला. ते एबीपी माझाशी बोलत होते.
उदयनराजे भोसले यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेऊन, शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर तुफान टीका केली होती. त्याला शिवेंद्रराजेंनी उत्तर दिलं.
शिवेंद्रराजे भोसले काय म्हणाले?
“तुमची दहशत आहे, त्याला जशास तसं उत्तर द्यायला लागतं. त्यांना पण कळून चुकलंय की आता पूर्वीची परिस्थिती राहिली नाही. त्यामुळे ते वैयक्तिक आरोप करत आहेत.
ते काल म्हणाले खुडूक कोंबडी आहे. पण खासदारांना कोंबड्या खुडूक आहेत की अंड्याला आल्या हे तपासायचं ट्रेनिंग कधी मिळायला लागलं? त्यांना मिळालं असेल तर ते सर्किट हाऊसला तपासत बसतात की ऑफिसर्स क्लबवर तपासतात हे मला माहित नाही.
पण त्यांच्या हातात हात परत द्यायचा की नाही, कारण आपल्या हाताला वास वगैरे येईल, याबाबतचा विचार सातारकरांनी करावा”, असं शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.
‘कॉलर उडवायला अक्कल लागत नाही’
“कॉलर प्रत्येकाच्या शर्टला असते. कॉलर उडवायला अक्कल लागत नाही. तुम्ही कामाचं बोला. किती कामं झाली हे सांगा”, असा सवालही शिवेंद्रराजेंनी केला.
मला लोकांसमोर जायला मी दाढी काढतो, मिश्या काढतो, भुवया काढतो असे डायलॉग मारायची गरज लागत नाही. अनेकवेळा ते घोषणा करतात की काम झालं नाही तर मिश्या काढेन, भुवया काढेन वगैरे, पण काहीच नाही, नुसती डायलॉगबाजी.
कोणाच्याही घरावर चालत होत असेल, तर कोणीही शांत बसत नाही. मग तो श्रीमंत असो, राजकारणी असो वा सर्वसामान्य तो शांत बसणार नाही. संघर्षाची ठिणगी तुम्ही टाकली आहे. जे काय असेल ते त्यांना सोसावं लागेल.
ते नेहमी म्हणतात समोरासमोर या. आम्ही आलो होतो, तर तुम्ही का पळून गेला? पळपुटेपणा का दाखवला, असा सवालही त्यांनी केला.
VIDEO:
उदयनराजे काय म्हणाले होते?
"आमदार-खासदार कोणीही होऊ शकतो. उदयनराजेंच्या ओटात एक आणि पोटात एक असं नसतं. यांच्या संकुचित बुद्धीला व्यापकता कधी येणार याची वाट पाहतोय. दिलदारपणा हवा. उगीच कॉलर उडवत नाही. लोकांची कामं करतो म्हणूनच कॉलर उडवतो. तुम्ही कामाच्या बाबतीत बोला. मी असं केलं आणि तसं केलं अशी फालतूगिरी नको", असं उदयनराजे म्हणाले.
"दुसऱ्यांवर चिखलफेक करायला अक्कल लागत नाही. लोकांची कामं करुन घ्यायला अक्कल लागते. सर्व जाहिरनामे काढून समोर बसा. मी सगळी कामं खट्ट केली. यांचे संकुचित विचार असतील तर त्यात माझा दोष नाही", अशी टीकाही उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंवर केली.
VIDEO:
संबंधित बातम्या
मी फक्त एकालाच घाबरतो, अभिजीत बिचुकलेला : उदयनराजे भोसले
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement