Shivaji University Senate Election 2022 : शिवाजी विद्यापीठ अधिसभेसाठी मतमोजणी सुरु; निकालाची उत्सुकता शिगेला
Shivaji University Senate Election 2022 : शिवाजी विद्यापीठ अधिसभेसाठी आज सकाळी मतमोजणी सुरु झाली आहे. 100 हून अधिक उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद आहे.
Shivaji University Senate Election 2022 : शिवाजी विद्यापीठ अधिसभेसाठी आज सकाळी मतमोजणी सुरु झाली आहे. सोमवारी सरासरीच्या 40 टक्क्यांच्या आसपास मतदान झाले होते. आज होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सकाळी 8 वाजल्यापासून विद्यापीठातील परीक्षा भवन येथे मतमोजणी सुरु झाली आहे. 100 हून अधिक उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद आहे.
शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी विरुद्ध शिव-शाहू आघाडीअंतर्गत शिवाजी विद्यापीठ (Shivaji University Senate Election 2022) शिक्षक संघ (सुटा), स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, युवा सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नोंदणीकृत पदवीधर गटात 36 हजार 343 मतदारांची नोंदणी झाली होती. त्या तुलनेत मतदान होईल, असा अंदाज होता. मात्र, गेल्या निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही मतदारांचा निरुत्साह जाणवला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी काम पाहिले.
नोंदणीकृत पदवीधरांच्या मतदान नोंदणीसाठी जोरदार मोहीम राबवण्यात आली होती. असे असूनही त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आला नाही. 25 हजारांवर मतदार गेले कोठे असाच प्रश्न मतदानानंतर उपस्थित झाला (Shivaji University Senate Election 2022)
शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटसाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील 33 मतदान केंद्रांवर मतदान झाले होते. अधिसभा शिक्षक, विद्यापीठ शिक्षक, नोंदणीकृत पदवीधर, अभ्यास मंडळासाठी मतदान झाले. यंदा पदवीधरसाठी तीनपट जास्त नोंदणी होऊनही केवळ 30 टक्केच मतदान झाले. पदवीधरसाठी 36 हजार 343, तर शिक्षकसाठी 640 मतदार होते. अधिसभा (39), विद्यापरिषद (8), तर नऊ अभ्यास मंडळांच्या 27 जागांसाठी निवडणूक होत आहे. शिक्षक गट, विद्यापरिषद आणि अधिकार मंडळावरील वर्चस्वासाठी विकास आघाडी आणि शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) यांच्यात थेट लढत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या