एक्स्प्लोर

छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक प्रेरणेचं केंद्र : मोहन भागवत

शिवरायांना विसरून भारताचं उत्थान शक्य नाही, असंही ते म्हणाले. रायगडावर शिवपुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते.

रायगड : अन्याय आणि शोषणमुक्तीसाठी लढणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणेचं केंद्र आहेत. संघटीत शक्तीच्या आधारावर समाजाचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे, असं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. रायगडावर शिवपुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते. ''छत्रपती शिवाजी महाराज हे मार्गदर्शक पुस्तक आहेत. त्यांनी चेतना, संकल्प, सद्गुण जागवले, त्यांनी कधीच भेदभाव केला नाही, हा अमूकची पूजा करतो, तो तमूकची पूजा करतो म्हणून भेद केला नाही,'' असंही मोहन भागवत म्हणाले. दरम्यान, ''इथे स्मृतीदिनी पुढच्या वर्षी मोठ्या संख्येने या,'' असं आवाहनही मोहन भागवतांनी केलं. शिवरायांना विसरून भारताचं उत्थान शक्य नाही, असंही ते म्हणाले. ''जोपर्यंत रायगड उभा आहे, तोपर्यंत भारतात शिवाजी जन्मण्याची शक्यता आहे. शिवाजी घरोघर असण्याची आवश्यकता आहे आणि तो माझ्या घरी असला पाहिजे, आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे,'' असं मोहन भागवत म्हणाले. ''आपल्या देशात आई-बहिणी सुखरूपणे सदा-सर्वदा रस्त्यावरून जातील याची शाश्वती नाही, हे कशामुळे झालं?, गडाची डागडुजी झाली तेव्हा सोन्याचा हंडा मिळाला, कोणी एक पैसा घरी नेला नाही आणि अशा आपल्या देशात भ्रष्टाचार विरोधात आंदोलन करण्याची पाळी आली हा दोष कुणाचा आहे,'' असा सवालही त्यांनी केला. ''छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक चांगल्या गोष्टी केल्या. राज्यव्यवहाराची भाषा बदलली. भारतीय भाषांमध्येच भारताचे व्यवहार झाले पाहिजेत,'' असंही मोहन भागवत म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांच्या कन्या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. मोहन भागवत यांना कार्यक्रमाला बोलावल्यामुळे अदिती तटकरे वादात अडकल्या होत्या. अखेर यावर सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. संबंधित बातम्या :

अदिती शिवपुण्यतिथी कार्यक्रमाच्या आयोजक नाहीत : सुनील तटकरे

रायगडावर शिवपुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget