प्रकाश आंबेडकर मविआचे महत्त्वाचे घटक, त्यांचा योग्य सन्मान होईल : संजय राऊत
मुंबई : निवडणुका 6 महिन्यांवर आल्या आहेत. विधानसभा निवडणुका हे घेणार नाहीत का? 10 जानेवारीला काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. मुख्यमंत्री घटनाबाह्य पद्धतीने बसले आहेत.
मुंबई : निवडणुका 6 महिन्यांवर आल्या आहेत. विधानसभा निवडणुका हे घेणार नाहीत का? 10 जानेवारीला काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) घटनाबाह्य पद्धतीने बसले आहेत. निवडणूक आयोग घटनाबाह्य सरकारला पाठबळ देत आहे. ज्या प्रकरणात संसद चालली नाही, लोकं बाहेर पडली होती, त्या प्रकरणी क्लीन चिट देण्यात आली. जो न्याय अदानींना मिळतो.. देशातील जनतेला का मिळत नाही? हा प्रश्न आहे. अदानी श्रीमंत म्हणजे भाजप श्रीमंत, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी भाजपला लगावला.
जागावाटपाची चर्चा, महाविकासआघाडीत कोणताही वाद नाही
महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये जागावाटप अंतिम टप्प्यात आलेलं आहे. कोणतेही मतभेद नाहीत. जागावाटपा संदर्भात काँग्रेसमध्येही आणि शिवसेनेमध्येही तसे कोणते मतभेद आम्हाला दिसत नाहीत. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांच्या आधीच युती झालेली आहे. ती युती असल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे वंचित बहुजन आघाडीला माहाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्यात कोणतीही हरकत नाही. प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर सकारात्म चर्चा झाली आणि वाटाघाटी करत आहोत. या देशांमध्ये मोदींचे राज्य असू नये या देशांमध्ये लोकशाही टिकावी यासाठी आमच्या बरोबरीने प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रात आणि देशांमध्ये आवाज उठवतात. प्रकाश आंबेडकर हे फक्त महाराष्ट्राचे नेते नाहीत तर या देशातल्या समस्त वंचित आणि बहुजन समाजाचे नेते आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याशी महाराष्ट्रामध्ये अत्यंत सन्मानाने चर्चा होत्या आणि त्यांचा पक्ष महाविकास आघाडीचा एक महत्त्वाचा घटक आहे.
सत्याचा विजय होतो म्हणजे अदानींचा विजय होतो
त्यांचा आत्मविश्वास ते कुठून आणतात ते पहावं लागेल. निवडणुका सहा महिन्यांवर आल्या आहेत. विधानसभा निवडणुका हे घेणार नाहीत का? अजून मुख्यमंत्रीपद नेमण्याची संविधानाने तरतूद केली नाही, 10 जानेवारीला काय निकाल लागतो यावर अख्या देशाच लक्ष लागलेलं आहे, घटनाबाह्य पद्धतीने मुख्यमंत्री बसलेले आहेत. घटनाबाह्य सरकार सुरू असताना या देशाचं सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग या घटनाबाह्य सरकारला अप्रत्यक्षपणे पाठबळ देत आहे हे लोकशाहीचे दुर्दैव आहे. या देशात सत्याचा विजय होतो म्हणजे अदानींचा विजय होतो, असा टोला राऊतांनी लगावला.
अदानींच्या न्यायालय निकालावर काय म्हणाले ?
सर्वोच्च न्यायालयाने ज्याप्रकारे काल निकाल लावला त्यावर आम्ही काही टिप्पणी करणार नाही. कारण आजही न्यायालयाचा निर्णय खाली मान घालून मान्य करायची प्रथा आहे, त्या निकालानंतर अदानी म्हणाले सत्याचा विजय होतो. ज्या प्रकरणात संसद झालेली नाही, लोक रस्त्यावर उतरली, सत्य बाहेर आलं नाही उलट त्यांना क्लीन चीट मिळाली मग हे सत्य इतरांच्या बाबतीत कुठल्या बिळात लपवलं जातं. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश देऊन देखील या विधिमंडळाचे अध्यक्ष निर्णय घ्यायला तयार नाहीत, अशा वेळेला जो न्याय अदानी यांना मिळतो तो न्याय या देशातील नागरिकांना कायदाप्रिय जनतेला का मिळत नाही? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.
अदानी श्रीमंत आहेत म्हणजे भाजप श्रीमंत आहे
शंभर उद्योगपतींची कर्ज माफ होतात आणि शेतकऱ्यांची कर्ज माफ होत नाहीत म्हणून तो आत्महत्या करतो. अदानींची श्रीमंती म्हणजे भाजपाची श्रीमंती यांच्यामुळे देश श्रीमंत झाला, असं मी मानत नाही. धारावी असेल वेगळी मिठागर असतील सार्वजनिक मालमत्ता असेल हे एकाच उद्योगपतीला सरकारने दिल्यावर सरकार तो श्रीमंत होणारच. महाराष्ट्रातला आणि देशातला सर्वसामान्य मजूर शेतकरी श्रीमंत झाला आहे का? या संदर्भात भाजपने स्पष्टीकरण दिलं पाहिजे, असे राऊत म्हणाले.
देशाला पाच हजार वर्ष मागे घेवून जात आहेत
पंडित नेहरूंपासून पुढली 50 वर्ष या देशामध्ये ज्ञान, विज्ञान, शिक्षण अंतराळामध्ये प्रचंड प्रगती केली. उद्योग क्षेत्रात आम्ही झेप घेतली, त्याला कारण होतं की त्यांनी या देशाला आधुनिकतेचा मार्ग दाखवला, विज्ञानाचा मार्ग दाखवला, संशोधनासाठी त्यांनी अनेक संस्था उभ्या केल्या. पण आत्ताचे जे काही राज्यकर्ते आहेत ते या देशाला पाच हजार वर्ष मागे घेवून जात आहेत. याचं कारण असं की त्यांच्या विचाराला आधुनिकतेची जोड नाही. अजूनही ते कुठल्या चिखलात लोळावे अशा पद्धतीने राज्य करत आहेत. ते जंगल राज्य आणि जंगलाचा कायदा कायदा आणू इच्छित आहेत. त्यामुळेच देशात दहा वर्षापासून बेरोजगारी वाढत आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत, महागाई वाढत आहे, असे संजय राऊत म्हणाले.