Sanjay Raut : लोकशाहीला गटारात बुडविणारे राजकारण राजभवनातून होतोय, हे लाजिरवाणे आहे, संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut : राज्यपालांसारखी व्यक्ती असे करेल का ? गलिच्छ राजकारण आहे. लोकशाहीला गटारात बुडविणारे राजकारण राजभवनातून व्हावे हे देशाला लाजिरवाणे आहे,

Sanjay Raut : आता जे चालू आहे ती तात्पुरती झटपट आहे, लोकशाही आहे की नाही हे 11 जूलै रोजीच कळेल. राज्यपालांसारखी व्यक्ती असे करेल का ? गलिच्छ राजकारण आहे. लोकशाहीला गटारात बुडविणारे राजकारण राजभवनातून व्हावे हे देशाला लाजिरवाणे आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया राऊतांनी दिली. संजय राऊत यांनी शुक्रवारी एबीपी माजाला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी भाजप आणि बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेतला.
आम्ही मैदानात कायम असतो, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सर्वच मैदानात आहेत, शिवसेना मैदानातील संघटना आहे. लॉकरमधली संघटना नाही. उघडले लॉकर दिले पैसे असे नाही, असा टोला संजय राऊत यांनी आपल्या शब्दात लगावला. तुमच्या जन्माच्या आधीपासूनच मी शिवसेनेत आहे. पक्षाचा कामात आहे. मित्रमंडळ विस्तार होईल त्यांना फक्त माणसं चिटकवून द्यायची आहेत. 40 लोक घेऊन गेलेत आता किती लोकांना मंत्रिपद देणार? चिमणराव आणि यांची गुलाबराव संबंधित ऑडिओ क्लिप ऐकली अजून क्लिप येतील. बाळासाहेब यांची शिवसेना फोडत आहात त्यामुळे शिवसैनिकांचा मराठी माणसाचा शाप लागेल. मुख्यमंत्री समोर राज्य चालवायचे की हे माणसे संभाळायचे ही डोकेदुखी आहे, असेही राऊत म्हणाले.
राज्यात जे घडतेय त्यामध्ये मोदींनी लक्ष घालायला पाहिजे, माझं आवाहन आहे, असे संजय राऊत म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘दुसरा बाजीराव’ असा पहिला लेख मी लिहिला, ज्यावेळी मोदी विरोधी लाट होती, तेव्हा सामना भक्कम पणे मोदींची बाजू मांडत होता. मोदींना आम्ही नेता मनात होतो, आजही मानतो. शिवसेना संपविण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे आम्ही अस्तित्वासाठी उभे राहिलो. हिंदुत्व कपडे आहेत का सोडायला? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
आम्ही तुमचे काय वाईट केले, उलट वाईट काळात आम्ही उभे राहिलो. उद्धव ठाकरे यांनी आमदारांना निवडून येण्यासाठी सर्व काही दिले, त्यांनी निवडून आणले. आता त्यांनीच बंडखोरी केली. भाजपने ऐनवेळी युती तोडली 5 जागा ही शिवसेनाला मिळणार नाही, असे म्हणत होते आम्ही 63 जागा जिंकलो, असे राऊतांनी स्पष्ट सांगितले. तुम्ही का गेला सर्वाना माहिती ढोंग बाजूला ठेवा. बेईमानी केली तरी आम्ही विसरलो. मजबुरी आहे म्हणून ते गेले आहेत, असेही बंडखोर आमदारांना राऊतांनी सुनावले.























