Sanjay Raut : तुमच्याकडे पैसे असतील, आमदार असतील, आमच्याकडे मातोश्री आहे; संजय राऊतांनी सुनावले
Sanjay Raut : हमारे पास माँ मातोश्री आहे. दिवार चित्रपाटीत डायलॉगप्रमाणे संजय राऊत यांनी बंडखोर आमदार आणि भाजपावर निशाणा साधला.

Sanjay Raut : संजय राऊत खूप बोलतात असे म्हणतात. माझ्या बोलण्याचा, लिखाणाचा फायदा झाला, मी सभा घेतल्या, जिथे उद्धव ठाकरे, आदित्य पोहचले नाहीत, तिथे मी गेलो आणि सभा घेतल्या. बाळासाहेबांचा शिवसैनिक मातोश्रीशी बेईमानी करणार नाही. हमारे पास माँ मातोश्री आहे. दिवार चित्रपाटीत डायलॉगप्रमाणे संजय राऊत यांनी बंडखोर आमदार आणि भाजपावर निशाणा साधला. तुमच्याकडे पैसे असतील, तुमच्याकडे आमदार असतील.. आमच्याकडे मातोश्री आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी सुनवाले.
आज तुम्ही एकत्र येऊन बोलत आहात, समोर येऊन उद्धव ठाकरेंशी बोलले असते तर मार्ग निघाला असता. मी खोडा घालणारा नाही. मी पक्ष तोडणारा नाही जोडणारा माणूस आहे. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आयोध्येला माझा बरोबर होते. खांद्यावर हात टाकून फिरत होते. हात धरून आम्ही एकमेकांना पूढे करायचो. मला टार्गेट करणे भाजपची इच्छा आहे. संजय राऊत यांचा अडसर वाटतो, द्वेष वाटतो, भाजप काही करू शकले नाही. आता हे लोक भेटले, आता भाजपचे लोक माझ्यावर कोणी बोलत नाहीत हे लोक बोलताय, असेही संजय राऊत म्हणाले.
माझ्याविषयी चीड, द्वेष आहे. आता भाजप नाही ,हे लोक माझ्यावर बोलत आहेत. मी ठाकरे शी बेईमानी करणार नाही. श्रीरामाच्या हातातील धनुष्यबाण काढणे शक्य नाही. तुम्ही बाळासाहेब यांनी निर्माण केलेला धनुष्यबाण खेचून घेत आहात. जप्त करत आहात, यावरून वृत्ती कळते. बाळासाहेब यांचे शिवसैनिक म्हणतात. मग त्यांनी निर्माण केलेले का जप्त करत आहात असा सवाल राऊतांनी बंडखोर आमदारांना विचारला. कोर्टानं अपात्र तेचि याचिका असताना बहुमतासाठी परवानगी मिळते आम्ही कोणाकडे दाद मागावी हा प्रश्न आहे, असेही राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत. दिल्लीत जाऊन उभं राहवच लागते. त्यांनी मुख्यमंत्री बनवले ते आदेश पाळावे लागततील, असा टोला राऊतांनी लगावला. आरे जंगल रोखणार का? बेळगाव सह सीमा भाग केंद्रशासित करण्यासाठी मागणी करणार का? सीमा भागावर हल्ले होत आहेत ते थांबविणार का? असे प्रश्न संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले. केंद्रात, राज्यात, कर्नाटक मध्ये भाजप सरकार आज मला कुठेतरी अडकवून ठेवायचे म्हणून वॉरंट, नोटीस बजवतात, असाही आरोप त्यांनी केला.























