सगळ्यांना उद्या कळेल महाराष्ट्र काय आहे? भाजपने पत्रकार परिषद जरुर पाहावीच - संजय राऊतांनी दंड थोपटले
Shiv Sena Sanjay Raut Press Conference : संजय राऊत यांनी भाजप आणि तपास यंत्रणा विरोधात दंड थोपटले आहेत. सगळ्यांना उद्या कळेल महाराष्ट्र काय आहे? भाजपने पत्रकार परिषद जरुर पाहावीच, असे राऊत म्हणाले.
Shiv Sena Sanjay Raut Press Conference : शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत मंत्री नवाब मलिकांप्रमाणे पत्रकार परिषद घेऊन आरोपांचे बॉम्ब फोडण्याच्या तयारीत आहेत. सोमवारी पत्रकारांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि तपास यंत्रणा विरोधात दंड थोपटले आहेत. सगळ्यांना उद्या कळेल महाराष्ट्र काय आहे? भाजपने पत्रकार परिषद जरुर पाहावीच, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.
उद्या शिवसेना पक्ष नाही, तर महाराष्ट्र, मराठी माणूस बोलणार आहे. जनतेने माझी उद्याची पत्रकार परिषद ऐकायलाच हवी. भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणाचे प्रमुख आहेत त्यांनीही पत्रकार परिषद ऐकायला हवी. सगळ्यांना उद्या कळेल महाराष्ट्र काय आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
उद्या हे विचारतील शिवसेना म्हणजे महाराष्ट्र का ? विचारतील तर होय शिवसेना म्हणजे महाराष्ट्र आहे. कोणीही उठतो प्रधानमंत्री आणि महाराष्ट्र बदनाम करतो, इथले भाजपचे गांडुळ शांत बसतील. पण महाराष्ट्र ऊसळेल , नुसतं उठणार नाही ,, महाराष्ट्राचे वंशज आहोत ,हे दाखाऊन देऊ, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. 'त्यांच्या रक्तात धाडस नाही, आमच्या रक्तात धाडस आहे, ते दाखवून देऊ. उद्या स्वतः पक्षाप्रमुखांचं या पत्रकार परिषदेवर लक्ष असेल, त्यांच्या मार्गदर्शनात ही पत्रकार परिषद होईल. ही पोलखोल नाही, त्याना खोलायला किती वेळ लागतो ? ते पोकळ आहेत, असे संजय राऊत म्हणाले.'
आम्ही खूप सहन केलं आम्ही, बर्बाद पण आम्हीच करणार आहोत. डोक्यावरुन खूप पाणी गेलंय? आता बघाच, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. उद्या शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहे. तिथं संपूर्ण पक्षासह पदाधिकारी, सर्व आमदार, खासदार उपस्थित असतील. मी आताच बोलणार नाही, उद्या सर्व गोष्टींवर उत्तरं मिळतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राऊतांनी म्हटलं की, भाजपचे साडे तीन लोकं हे त्याच (अनिल देशमुखांच्या) कोठडीत असतील. महाराष्ट्रात देखील सरकार आहे, शिवसेनेच्या नेतृत्वातलं सरकार आहे. त्यांची झोप उडाली आहे. जे करायचं ते करा आता मी घाबरणार नाही, असं राऊतांनी म्हटलं आहे.
नागरिकांसमोर वस्तुस्थिती मंडणायसाठी ही पत्रकार परिषद - अनिल देसाई
उद्या शिवसेना भवनात पत्रकार परिषद आहे. त्या बैठकीत शिवसेना नेते , खासदार सगळे जमणार आहेत. शिवसेनेला शक्तिप्रदर्शन करण्याची गरज नाही. पण शिवसैनिक स्वतः उद्या जमतील. आम्ही कोणाला बोलवत नाही ,शिवसैनिक स्वतः येतील. ज्या घडामोडी सुरू आहेत , काय काय केलं जातंय , दबाव टाकला जातो, त्यावर उद्या बोलतील. उद्या कोण कोणाच्या रडारवर आहे ते कळेल. जनतेसमोर, सरकार समोर प्रत्येक नागरिकांसमोर वस्तुस्थिती मंडणायसाठी ही पत्रकार परिषद आहे, असे शिवसेना नेते अनिल देसाई म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :