दंड ठोकणार असाल तर RTO ऑफिसला कुलूप लावेल, आमदार संतोष बांगर आक्रमक, अधिकाऱ्याची काढली लाज
Santosh Bangar Hingoli News : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे नेहमीच विविध वक्तव्यामुळं चर्चेत असतात.

Santosh Bangar Hingoli News : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे नेहमीच विविध वक्तव्यामुळं चर्चेत असतात. अशातच आज देखील संतोष बांगर यांनी फोनवर एका आरटीओ अधिकाऱ्याची लाज काढल्याचे पाहाला मिळाले. शाळकरी ऑटोला दंड लावल्याने आमदार बांगर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. बांगर यांनी अधिकाऱ्याला झापल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दंड ठोकणार असाल तर मी आरटीओ ऑफिस ऑफिसला कुलूप लावून टाकेल
विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन येणाऱ्या ऑटोला आरटीओ अधिकाऱ्याने मोठ्या प्रमाणात दंड ठोठावला होता. यानंतर हे ऑटोचालक आमदार संतोष बांगर यांच्याकडे गेले. त्यांनीसंबंधित आरटीओ अधिकाऱ्याची दंड मागितल्याने बांगर यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर आक्रमक झालेल्या आमदार बांगर यांनी आरटीओ अधिकार्याला फोन करत चक्क त्या अधिकाऱ्याची लाज काढली आहे. अशा पद्धतीने दंड ठोकणार असाल तर मी आरटीओ ऑफिस ऑफिसला कुलूप लावून टाकेल असा सज्जड दम आमदार संतोष बांगर यांनी दिला आहे. दरम्यान, अशा पद्धतने आमदार आरटीओ अधिकाऱ्याला झपाताणाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर प्रकाशझोतात आलेले संतोष बांगर यापूर्वी अनेकवेळा आपली वादग्रस्त विधानं आणि आपल्या भूमिकांमुळे चर्चेत राहीले आहेत. शिंदे गटात सर्वांत शेवटी दाखल झालेले आमदार म्हणजे संतोष बांगर. पण त्यापूर्वी पक्षात बंड झाल्यानंतर आणि एकामोगामाग एक आमदार शिंदे गटात सामील होत असताना संतोष बांगर यांनी जाहीर कार्यक्रमात आपण उद्धव ठाकरे यांची साथ कधीही सोडणार नाही, अशी घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर काही दिवसातच ते शिवसेना शिंदे गटात दाखल झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर सरकारच्या विश्वासमतासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संतोष बांगर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने होते. परंतु दुसऱ्या दिवशी एका रात्रीत संतोष बांगर यांनी ठाकरेंची साथ सोडली आणि ते शिंदे गटात सामील झाले.
कोण आहेत संतोष बांगर?
संतोष बांगर हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आहेत. 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत ते निवडून आले आहेत.
2017 मध्ये त्यांची हिंगोली जिल्हा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून नेमणूक झाली होती.
संतोष बांगर यांचं शिक्षण सातवीपर्यंत झालेलं आहे.
त्यांच्यावर सरकारी कामात व्यत्यय आणणे, बेकायदेशीर कृत्य करणे, बदनामी करणे, दंगल घडवून आणणे आणि इतर गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत.
महत्वाच्या बातम्या:
























