Shiv Sena MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता किती दिवस चालणार? विधानसभा अध्यक्षांनी भर सुनावणीत वेळापत्रकच वाचून दाखवले
MLA Disqualification : आमदार अपात्रता सुनावणी ही 18 दिवस चालाणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले. विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीच्या तारखा दोन्ही गटासमोर वाचून दाखवल्या.
मुंबई : सगळ्या देशाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी (Shiv Sena MLA Disqualification Case) प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी महत्त्वाची माहिती दिली. आमदार अपात्रता सुनावणी ही 18 दिवस चालाणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले. विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीच्या तारखा दोन्ही गटासमोर वाचून दाखवल्या. या प्रकरणाची सुनावणी नागपूर (Nagpur) येथेही होणार असल्याचे नार्वेकर यांनी म्हटले.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद सुनिल प्रभू यांची शिंदे गटाचे वकिल अॅड. महेश जेठमलानी यांच्याकडून उलट तपासणी सुरू आहे. बुधवारी आमदार अपात्रता सुनावणी दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणीच्या गतीवरून नाराजी व्यक्त केली होती. फक्त 16 दिवस माझ्याकडे या सुनावणी साठी आहे त्यात हे प्रकरणाची सुनावणी संपवून निर्णय घ्यायचा आहे, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले. नार्वेकर यांनी म्हटले की, मला 31 डिसेंबरपर्यंत या प्रकरणांची सुनावणी संपवायची आहे. सार्वजनिक सुट्ट्या आणि अधिवेशन कालावधी वगळता माझ्याकडे या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करण्याकरिता फक्त 16 दिवसाचा कालावधी आहे असल्याचे त्यांनी दोन्ही पक्षकारांना सांगितले होते. त्यानंतर आज विधानसभा अध्यक्षांनी आज सुनावणीचे वेळापत्रक जाहीर केले.
आमदार अपात्रता सुनावणीचे असे आहे वेळापत्रक
शिवसेना आमदार आपत्रता प्रकरण सुनावणी 18 दिवसांमध्ये चालणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीच्या तारखा दोन्ही गटासमोर वाचून दाखवल्या.
>> पुढील सुनावणी तारखा -
> 28, 29 आणि 30 नोव्हेंबर
> 1, 2, 5, 6 आणि 7 डिसेंबर
> 11 ते 15 डिसेंबर सलग सुनावणी
> 18 ते 22 डिसेंबर सलग सुनावणी
हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू झाल्यास 11 डिसेंबरपासून सुनावणी नागपूरला होणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले. एकूण 18 दिवसात सुनावणी पूर्ण करायची आहे हातात असलेले दिवस आणि तारखा दोन्ही गटासमोर नार्वेकर यांनी सांगितल्या. यापुढे सार्वजनिक सुट्या मिळून या तारखा आता सुनावणीसाठी असणार आहेत.
हिवाळी अधिवेन 7 डिसेंबरपासून सुरू होणार की 11 डिसेंबरपासून सुरू होईल ह्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणीदरम्यान दिली.