एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

MLA Disqualification Case : शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सुनावणी आणखी लांबणार? मुदत वाढवून देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात आज निर्णय

MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेच्या सुनावणीवर आज सुप्रीम कोर्टात निर्णय होणार आहे. दरम्यान सुनावणी आणखी लांबणीवर पडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुंबई : शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सुनावणी (Shiv Sena MLA Disqualification Case) सध्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सुरु आहे. राहुल नार्वेकरांना या प्रकरणावर 31 डिसेंबरपर्यंत निकाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले आहेत. पण  निकाल वेळेत देता येणार नसल्याने मुदतवाढ देण्याची विनंती राहुल नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. याच संदर्भात सर्वोच्च न्यायालयात शुक्रवार 15 डिसेंबर रोजी सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे आमदार अपात्रतेची सुनावणी आणखी लांबणीवर पडणार का हे आज स्पष्ट होईल. 

आमदार अपात्रतेच्या सुनावणीवरुन मागील काही दिवसांपासून अनेक दावे - प्रतिदावे होत आहेत. त्यातच अनेक नेत्यांची उलटतपासणी देखील केली जातेय. त्यातच दिलेल्या मुदतीत निकाल देणे कठीण असून यासाठी वेळ वाढवून द्यावा अशी विनंती राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली असल्याची माहिती समोर आली होती. 

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर निकाल घेण्यास उशीर?

नागपुरात सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. 7 डिसेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीमध्ये अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. पण त्याचवेळी विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रतेची सुनावणी देखील घ्यावी लागत आहे. त्यामुळे देखील यावर निर्णय घेण्यास उशीर होऊ शकतो, अशा चर्चा सुरु होत्या. तसेच अशावेळी अध्यक्षांची तारेवरची कसरत होणार असून, त्यांना अधिवेशनाचे कामकाज, आमदार अपात्रेतची सुनावणी अशी कामं करावी लागत आहेत. 

वेळापत्रकात बदल

शिंदे आणि ठाकरे गटाच्या संमतीने आमदार अपात्रता प्रकरणावर पुन्हा एकदा बदल केला आहे. आता, शनिवारी आणि रविवारी होणारी सुनावणी दोन्ही गटाच्या संमतीने रद्द करण्यात आली आहे. आता, अंतिम सुनावणी 18 डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. 12 डिसेंबर रोजी शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे आणि शेवटी भरत गोगावले यांची उलट साक्ष नोंदवण्यात आली. आता, 13 डिसेंबरपासून ते तीन दिवस अर्थात 15 डिसेंबरपर्यंत  लेखी युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर अंतिम सुनावणी सोमवारी 18 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. पण आता मुदतवाढ मिळण्यास ही सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. 

मागील अनेक दिवसांपासून आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी घेण्यात येत आहे. दरम्यान या सुनावणीला दिरंगाई होत असल्याची याचिका देखील ठाकरे गटाने दाखल केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना खडेबोल सुनावले होते. पण पुन्हा एकदा हा अपात्रता प्रकरणाचा चेंडू सर्वोच्च न्यायलयाच्या मैदानात गेला असल्याचं चित्र आहे. त्यामुळे यावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

हेही वाचा : 

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह याचिकेवर उद्याच निर्णय होणार? सर्वोच्च न्यायालय निकाल देण्याची 'ही' आहेत कारणं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Oath Ceremony: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 1 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 1  December 2024Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  1 डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 1 डिसेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Oath Ceremony: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
नाकात नथ अन् पिवळी साडी; मंगलस्नान विधीत हळदीनं माखलेला शोभिता धुलिपालाचा लूक व्हायरल
नाकात नथ अन् पिवळी साडी; मंगलस्नान विधीत हळदीनं माखलेला शोभिता धुलिपालाचा लूक व्हायरल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
Embed widget