एक्स्प्लोर

MLA Disqualification Case : ठाकरे गटाने बनावट आणि खोटी कागदपत्रं सादर केल्याचा आरोप, शिंदे गटाची विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार

MLA Disqualification Case : शिवसेना ठाकरे गटाकडून बनावट आणि खोटी कागदपत्रं रेकॉर्डवर आणली जात असल्याची तक्रार करत तशा आशयाचा अर्ज शिंदे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे केला आहे.  

मुंबई: शिवसेना ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray) खोटी आणि बनावट कागदपत्रं सादर केल्याची तक्रार शिंदे गटाने (Eknath Shinde) केला आहे. त्यासंबंधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अर्ज देण्यात आला असून शिवसेना पक्ष कार्यालयातील कम्पुटर जप्त करण्याची मागणीही केली आहे. शिवसेना 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी  (MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्षांसमोर असून त्या दरम्यान शिंदे गटाने ही मागणी केली आहे. 

शिवसेना ठाकरे गटाने बनावट आणि खोटी कागदपत्रं सादर केल्याची तक्रार शिंदे गटाने अध्यक्षांकडे केली आहे. 22 आणि 23 जूनच्या संदर्भात जे ईमेल लेटर दिल्याचं ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभूंनी म्हटलं आहे. तो ईमेल आयडी अस्तित्वातच नसल्याचा युक्तीवाद शिंदे गटाने केला. शिवसेना ठाकरे गटाकडून बनावट आणि खोटी कागदपत्रं रेकॉर्डवर आणली जात असल्याची अर्जात तक्रार करण्यात आली आहे. विधान भवनातील शिवसेना पक्ष कार्यालयातील अनिल देसाई, सुनील प्रभू आणि विजय जोशी यांनी वापरलेले कॉम्पुटर, लॅपटॉप, टॅबलेट मोबाईल आणि इतर संपर्काची साधने जप्त करण्याची केली मागणी करण्यात आली आहे.

अध्यक्षांसमोर ठाकरे गटाकडून बनावट कागदपत्रे सूपर्द करण्यात आल्याप्रकरणी शिंदे गटाकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून बनावट आणि खोटी कागदपत्र रेकॉर्डवर आणली जात असल्याची अर्जात केली तक्रार करण्यात आली. ज्या ईमेल आयडीवर एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवल्याचा ठाकरे गटाचा दावा आहे, तो ईमेल आयडी ही अस्तित्वात नसल्याचा दावा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला. या ईमेल आयडीवर ई-मेल करून बाउन्स बॅक झालेल्या मेलचा रिपोर्ट देखील अध्यक्षांना या पत्रात जोडला आहे. 

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू आहे. गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस सुनावणी पार पडली होती. त्या दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे त्यांची पुन्हा साक्ष घेणं सुरू आहे. मागील आठवड्यातील सुनावणीमध्ये 21 जून 2022 रोजी ठाकरे गटाने  बजावलेल्या व्हिपसंदर्भात तसंच 21 जूनला घेण्यात आलेल्या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाने जो ठराव मांडला होता, त्यासंदर्भात अनेक प्रश्न, उपप्रश्न सुनील प्रभू यांना विचारण्यात आले होते. 

आतापर्यंत झालेल्या सुनावणीमध्ये सुनील प्रभू यांनी जारी केलेला 21 जून 2022 रोजी चा व्हीप, बैठकीतील ठराव, बैठकीतील आमदारांनी ठरावाला दिलेला अनुमोदन त्यांच्या सह्या या संदर्भात अनेक प्रश्न उपप्रश्न शिंदे गटाच्या वकिलांकडून विचारण्यात आले. त्यासोबत 31 ऑक्टोबर 2019 रोजी ज्या बैठकीत गटनेता म्हणून एकनाथ शिंदे आणि प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची निवड झाली ती निवड शिवसेना पक्षाचे आमदारांनी केली असून पक्षप्रमुख पक्षात कुठलेही पद शिवसेना पक्षाच्या घटनेत नसल्याचा शिंदे गटाच्या वकिलांनी सुनावणी दरम्यान नमूद केलं. 

ही बातमी वाचा:

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Embed widget