Arjun Khotkar 31 जुलै रोजी शिंदे गटात प्रवेश करणार?
शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर 31 जुलै रोजी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.
Arjun Khotkar : शिवसेनेचे जालना जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्या शिंदे गटाच्या (Shinde Group) प्रवेशाचा मुहूर्त ठरल्याचं कळलं. अर्जुन खोतकर 31 जुलै रोजी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतल्यापासून अर्जुन खोतकर शिंदे गटात कधी प्रवेश करणार याची चर्चा सुरु होती. पण खोतकर यांनी मात्र ठोस निर्णय सांगितला नव्हता. आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यात अर्जुन खोतकर यांचा प्रवेश होणार असल्याचं कळतं. अर्जुन खोतकर आणि अब्दुल सत्तार काही वेळापूर्वी दिल्लीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि तिथे त्यांची चर्चा झाली.
अर्जुन खोतकर हे गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत आहेत. दिल्लीत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. तसंच भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यासोबतही त्यांची भेट झाली. यामुळे त्यानंतर अर्जुन खोतकर हे शिंदे गटात सामील झाल्याची जोरदार चर्चा सुरु झाली होती. त्यात आज त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार अब्दुल सत्तार देखील उपस्थित होते.
ईडी कारवाईमुळे अर्जुन खोतकर शिंदे गटात?
शिंदे यांच्या बंडानंतर अनेक शिवसेनेचे आमदार आणि खासदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना पाहायला मिळत आहे. त्यातच आता माजी आमदार आणि खासदार सुद्धा शिंदे गटाकडे वळत आहे. जालना जिल्ह्यातील महत्वाचे नेते आणि माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी सुद्धा आता शिंदे गटात प्रवेश केला असल्याची चर्चा आहे. ईडीच्या कारवाईमुळे खोतकर शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती. मात्र खोतकर यांनी या अफवा असल्याचा खुलासा केला होता. तर अजूनही आपण शिवसेनेत असून, फोटोवर अंदाज बांधू नका असे खोतकर म्हणाले होते.
संकट असेल तर व्यक्ती सेफ होण्याचा प्रयत्न करेल : अर्जुन खोतकर
तीन दिवसांपूर्वी एबीपी माझाशी बोलताना अर्जुन खोतकर म्हणाले होते की, "माझ्यावर काही संकट असतील तर चेहऱ्यावर तणाव दिसू शकतो. संकट असेल तर कोणीही सेफ होण्याचा प्रयत्न करेल. नाही त्या गोष्टींमध्ये जर अडचणी निर्माण केल्या जात असतील तर तणाव दिसणारच. त्यामुळे अर्जुन खोतकर लवकरच शिंदे गटात सामील होण्याचे संकेत मिळाले होते.
संबंधित बातम्या
- Maharashtra Politics : शिंदे गटाच्या वाटेवर असलेल्या अर्जुन खोतकरांचे संजय राऊतांकडून अभिनंदन, म्हणाले...
- Arjun Khotkar ED Case : अर्जुन खोतकर यांचं ईडी प्रकरण काय आहे?
- Arjun Khotkar : संकट असेल तर कोणीही सेफ होण्याचा प्रयत्न करेल, जालन्यात जाऊन भूमिका स्पष्ट करणार : अर्जुन खोतकर
- Arjun Khotkar: अखेर अर्जुन खोतकर हे शिंदे गटात सामील?; दानवेंसोबतचा वादही मिटला