Arjun Khotkar: अखेर अर्जुन खोतकर हे शिंदे गटात सामील?; दानवेंसोबतचा वादही मिटला
ईडीच्या कारवाईमुळे खोतकर शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती. मात्र खोतकर यांनी या अफवा असल्याचा खुलासा केला होता.
![Arjun Khotkar: अखेर अर्जुन खोतकर हे शिंदे गटात सामील?; दानवेंसोबतचा वादही मिटला maharashtra News Aurangabad News Arjun Khotkar joins Shinde Group Arjun Khotkar: अखेर अर्जुन खोतकर हे शिंदे गटात सामील?; दानवेंसोबतचा वादही मिटला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/3c102753d7bd83cce6936081f291e6031658734307_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aurangabad News: शिंदे गटात सामील होणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आता माजी आमदार तथा शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांची भर पडली असल्याची चर्चा आहे. चार दिवसांपूर्वी खोतकर दिल्लीत असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यांनतर अखेर खोतकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. खोतकर हे मराठवाड्यातील शिवसेनेचे महत्वाचे नेते समजले जातात. त्यामुळे त्यांनी जर बंडखोरी केली तर शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तर खोतकर आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचे काही फोटो सुद्धा समोर आले आहे.
शिंदे यांच्या बंडानंतर अनेक शिवसेनेचे आमदार आणि खासदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडतांना पाहायला मिळत आहे. त्यातच आता माजी आमदार आणि खासदार सुद्धा शिंदे गटाकडे वळत आहे. जालना जिल्ह्यातील महत्वाचे नेते आणि माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी सुद्धा आता शिंदे गटात प्रवेश केला असल्याची चर्चा आहे. ईडीच्या कारवाईमुळे खोतकर शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती. मात्र खोतकर यांनी या अफवा असल्याचा खुलासा केला होता. तर अजूनही आपण शिवसेनेत असून, फोटोवर अंदाज बांधू नका असे खोतकर म्हणाले आहे.
चार दिवसांपूर्वी झाली होती शिंदेंची भेट...
चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत असतांना अर्जुन खोतकर हे देखील दिल्लीत होते. त्यामुळे काही माध्यम आणि सोशल मीडियावर खोतकर हे शिंदे गटात गेल्याची चर्चा होती. दरम्यान याबाबत अर्जुन खोतकर यांनी स्वतः खुलासा करत, आपण शेवटपर्यंत शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्यासोबतचं राहणार असल्याचे सांगितले होते. दिल्लीला आपण आपल्या व्यक्तिगत कामासाठी गेलो असतांना महाराष्ट्र सदनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची योगायोगाने समोरा-समोर भेट झाल्याने केवळ नमस्कार केल्याच खोतकर म्हणाले होते.
खोतकरांना ईडीची भीती?
खोतकर यांच्या जालन्यातील रामनगर येथील कारखान्यावर ईडीने धाडी टाकल्या होत्या. तर याप्रकरणी त्यांची काही संपत्ती सुद्धा जप्त केलेली आहे. तसेच यात गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. कारखाना खरेदी, विक्री व्यवहारात अनियमित्ता झाल्याचा ठपका ईडीने ठेवला होता. तसेच कारखान्यातील यंत्र, जमीन यासह इतर बाबी जप्त केल्या होत्या. त्यामुळे खोतकर यांनी ईडीची भीतीमुळेच शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे, पण खोतकर शिंदे गटात सामील झाल्याचे अजूनही कोणतेही अधिकृत घोषणा झालेली नाही.
दानवेंसोबतचा वादही मिटला
अर्जुन खोतकर आणि भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यातील वाद काही नवीन नाही. मात्र हे वाद आता मिटले असून, याबाबत खुद्द रावसाहेब दानवे यांनी माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला दोघांना एकत्र बसवले, मागील वाद विवाद सोडून द्या असे सांगितले. त्यामुळे मी हे कबूल केले असून, खोतकर यांनी सुद्धा कबूल केले असल्याचं दानवे म्हणाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)