एक्स्प्लोर

'मविआचा भाग व्हायचं असेल तर मविआतील स्तंभांवर बोलू नये'; संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला

Sanjay Raut : '' राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आजही भाजपसोबत (BJP) आहेत'', असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. त्यानंतर आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी मविआच्या संभांवर बोलू नये असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांना दिलाय.

मुंबई : 'प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)  यांना महाविकास आघाडीचा भाग व्हायचं असेल तर त्यांनी महाविकास आघाडीतील स्तंभांवर बोलू नये', असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत  ( Sanjay Raut ) यांनी वंचित बहुनज आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना दिलाय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे देशाचे नेते आहेत. भाजपविरोधात (BJP) आघाडी तयार करण्याच्या प्रयत्नातील शरद पवार हे मुख्य स्तंभ आहेत. सातत्याने ते या आघाडीसाठी प्रयत्न करत आहेत. भाजपच्या यंत्रणेने सर्वात जास्त हल्ले हे शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर केले आहेत. सध्या शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची  (Vanchit Bahujan Aghadi) युती झाली आहे. पुढील काळात ते महाविकास आघाडीचे घटक व्हावेत अशी आमची इच्छा आहे. परंतु, असं होणार असेल तर त्यांनी या आघाडीचे जे प्रमुख स्तंभ आहेत त्यांच्यावर बोलू नये, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. 

''शरद पवार हे आजही भाजपसोबत (BJP) आहेत'', असा दावा  प्रकाश आंबेडकर यांनी काल केला होता. दोनच दिवसांपूर्वी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) यांची राजकीय युती झाली. या युतीनंतर पुन्हा राजकीय क्षेत्रात भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यामुळे अनेक प्रश्नही उपस्थित होऊ लागले. ही युती ऐतिहासिक आहे का? सध्याच्या राजकारणात भाजपाला हरवण्यासाठी विरोधकांची एकी कशी महत्वाची आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. यातच काल एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शरद पवार हे भाजप सोबत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर  यांना आज असं महाविकास आघाडीच्या संभांवर बोलू नये असा सल्ला दिलाय. 

"त्यांचे मतभेद असतील पण त्यांनी अशी वक्तव्य करू नये, असा सल्ला संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिलाय. "मी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा केली आहे. भविष्यात आम्ही एकत्र बसून त्यांच्यात काय मतभेद असतील तर ते आम्ही दूर करू. परंतु, प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या संभांवर अशी वक्तव्य करू नये, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.  

महत्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar on Sharad Pawar: शरद पवार आजही भाजपसोबतच, लवकरच समजेल; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
Numerology : प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 11 PM 07 October 2024Zero Hour : 40 हजार कोटींची बिलं थकली, कंत्राटदारांवर आंदोलनाची वेळZero Hour Nagpur : बौद्ध लेणींच्या बचावासाठी एकवटले संभाजीनगरकरABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 9 PM 07 October 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
Numerology : प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, सुषमा अंधारेंनी उघड केलं नाव; पुण्यातील जागाही सांगितल्या
ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, सुषमा अंधारेंनी उघड केलं नाव; पुण्यातील जागाही सांगितल्या
Vastu Tips : रोजच्या जीवनातील 'या' 10 चुका आताच टाळा; गरिबीला मिळेल आमंत्रण, घरात टिकणार नाही पैसा
रोजच्या जीवनातील 'या' 10 चुका आताच टाळा; गरिबीला मिळेल आमंत्रण, घरात टिकणार नाही पैसा
Bopdev Ghat Incident : आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
Guru Vakri 2024 : तब्बल 12 वर्षांनंतर नवरात्रीत गुरु ग्रह वक्री; 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
तब्बल 12 वर्षांनंतर नवरात्रीत गुरु ग्रह वक्री; 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Embed widget