Sanjay Raut : संजय राऊत ईडीच्या ताब्यात, जाणून घ्या सकाळपासून काय झालं?
Sanjay Raut : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी आज सकाळीच ईडीचे ( ED ) पथक दाखल झाले आहे. पत्राचाळ प्रकरणी (Patra Chawl case) संजय राऊत यांची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.
Shivsena Sanjay Raut : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. राऊत यांच्या घरी आज सकाळीच ईडीचे ( ED ) पथक दाखल झाले आहे. पत्राचाळ प्रकरणी (Patra Chawl case) संजय राऊत यांची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. या कारवाईमुळे मोठ्या संख्येने शिवसैनिक संजय राऊत यांच्या निवास्थानाबाहेर जमा झाले आहेत. सकाळपासूनच शिवसैनिक राऊत यांच्या निवास्थानासमोर ठिय्या मांडून आहेत.
नऊ तासांत काय झाले?
रविवारी सकाळी सात वाजता दादरमधील गार्डन कोर्ट इमारतीतील संजय राऊत यांच्या फ्लॅटमध्ये ईडीचे अधिकारी दाखल झाले.
सकाळी 7.15 वाजता ईडीचे पथक संजय राऊत यांच्या भांडुपच्या घरी दाखल झाले. यावेळी संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनिल राऊत घरीच होते.
सकाळी 8.20 वाजता सुनिल राऊत खिडकीत आले.
सकाळी 8.40 वाजता शिवसेनेचे कार्यकर्ते संजयर राऊतांच्या घराबाहेर जमले आणि राऊतांच्या समर्थनात घोषणाबाजी केली.
सकाळी 8.46 ते 8.50 दरम्यान राऊतांचे चार ट्विट, शिवसेना सोडणार नाही, कोणत्याही घोटाळ्याशी काडीमात्र संबंध नाही, खोटी कारवाई, खोटे पुरावे, मी शिवसेना सोडणार नाही असे चार ट्विट संजय राऊत यांकी केले.
सकाळी नऊ वाजता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांची प्रतिक्रीया आली. राऊतांच्या भोंग्यामुळे शिवसेना फुटली, राऊतांच्या आजच अटकेची शक्यता, शिरसाठ यांची प्रतिक्रीया.
सकाळी 9.30 वाजता संजय राऊतांच्या घरी डीसीपी प्रशांत कदम सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पोहोचले.
सकाळी 10.28 वाजता संजय राऊतांचे वकील विक्रांत साबणे पोहोचले.
सकाळी 11.07 वाजता स्वत: संजय राऊत घराच्या खिडकीत आले आणि कार्यकर्त्यांना अभिवादन केलं.
सकाळी 11.25 वाजता आढावा बैठकीसाठी जाताना मुख्यमंत्र्यांनी राऊतांच्या कारवाईवर पहिली प्रतिक्रीया दिली.
दुपारी एक वाजता औरंगाबादमध्ये आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. कर नाही तर डर कशाला अशी राऊतांच्या कारवाईवर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली.
दुपारी 1.30 वाजता राजन विचारे दहा बसेस भरून ठाण्यातील शिवसैनिकांना घेऊन मातोश्रीवर दाखल झाले.
दुपारी साडेतीन वाजता संजय राऊत यांना ताब्यात घेण्याची ईडीकडून तयारी
दुपारी 3.50 वाजाता ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले.