एक्स्प्लोर

Eknath Shinde : शिंदेंचा विधानसभेसाठी मेगा प्लॅन, 43 लाख लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचण्याचं नियोजन, पत्रही लिहिणार

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिला मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तीनही पक्षांकडून केला जात असल्याचं दिसतंय. 

मुंबई : राज्याची विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मोठा प्लॅन आखण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या राज्यातील 42.80 लाख महिलांपर्यंत थेट पोहोचण्याचं नियोजन शिवसेनेकडून करण्यात आलं आहे. त्यासाठी सोमवारी वर्षा बंगल्यावर शिवसेनेचे आमदार आणि जिल्हाप्रमुखांसोबत मुख्यमंत्री चर्चा करणार आहे.

महायुती सरकारची एक महत्वाकाक्षी योजना म्हणून लाडकी बहीण योजनेकडे पाहिलं जातंय. या योजनेचा आपल्याला जास्तीत जास्त राजकीय फायदा व्हावा यासाठी महायुतीतील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. शिवसेनेने त्यासाठी एक मेगा प्लॅन तयार केला असून त्या माध्यमातून सर्व महिलांपर्यंत पोहोचण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. 

आमदार आणि जिल्हाप्रमुखांसोबत बैठक

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक घरापर्यंत, मतदारापर्यंत पोहोचण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे  प्रत्येक आमदार आणि जिल्हाप्रमुखासोबत चर्चा करणार आहेत. जे लोक या बैठकीला हजर राहू शकत नाहीत त्यांच्यासोबत झूम मिटिंगच्या माध्यमातून चर्चा केली जाणार आहे. 

प्रत्येत महिलेपर्यंत पोहोचण्याच्या सूचना

राज्यातील जे विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला अपेक्षित आहेत, पक्षाच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे अशा मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत करण्याचं धोरण आहे. अशा मतदारसंघातील 42 लाख 80 हजार महिलांपर्यंत शिवसैनिकांनी पोहोचण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक शिवसैनिकाने या महिलांपर्यत पोहोचावं असे निर्देश आहेत. त्याचसोबत स्वतः मुख्यमंत्र्यांनी लिहिलेला मजकूर असलेले पत्रही या महिलांना देण्यात येणार आहे. त्या माध्यमातून थेट लोकांपर्यंत पोहोचण्याचा नवीन प्रयत्न शिवसेनेकडून करण्यात येत आहे.  

लाडकी बहीण योजनेचा फायदा घेण्यासाठी महायुतीमध्ये चढाओढ

महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजनेचा आगामी विधानसभेमध्ये फायदा घेण्यासाठी तीनही पक्षांनी कंबर कसल्याचं दिसतंय. राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी या आधीच राज्यात जनसन्मान यात्रा सुरू केली आहे. त्या माध्यमातून अजित पवारांनी राज्यातील जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचण्याचा निश्चय केल्याचं दिसतंय. तर भाजपकडूनही या योजनेची जाहीरात केली जातेय. आता शिवसेनेनेही या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिला मतदारांपर्यंत पोहोचण्याचं नियोजन केल्याचं दिसतंय. 

ही बातमी वाचा :

                                               

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Mahadik : मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
Navneet Rana : ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
PM Modi In Nigeria : पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  1 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNavneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर आम्हाही तीच भाषा करू - नवनीत राणाDevendra Fadnavis : स्ट्राईक रेट आणि जागांवर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होणार नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik : मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
Navneet Rana : ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
PM Modi In Nigeria : पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Embed widget