ED : शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची राष्ट्रवादीच्या आमदाराविरोधात ईडीकडे तक्रार!
Shiv Sena Complaints against NCP MLA : महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा ईडी आवडू लागली आहे.
Shiv Sena Complaints against NCP MLA Baban Shinde in ED solapur : सध्या राज्याच्या राजकारणात एकमेकांवर आरोपांची मालिका सुरु आहे. रोज नवे आरोप, रोज नव्या तक्रारी. या आरोपांनंतर काही नेत्यांना परिणामही भोगावे लागले. काही नेत्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळूनही लावले. या सर्व आरोप प्रत्यारोपांच्या गोंधळात नेहमी चर्चेत राहिली ती ED अर्थात सक्तवसूली संचलनालय. भाजपनं ED चा वापर करुन राज्यातील सत्ताधाऱ्यांना त्रास दिला असल्याच्या तक्रारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केल्या. मात्र भाजपनं हा आरोप फेटाळत केंद्रीय तपास यंत्रणा त्यांचं काम करत असल्याचं वेळोवेळी सांगितलं.
महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केंद्र सरकार ईडीच्या माध्यमातून आपल्याला त्रास देत आहे अशी ओरड केली जाते. मात्र प्रत्यक्षामध्ये सत्ताधारी पक्षातल्या म्हणजे महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा ईडी आवडू लागली आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनदादा शिंदे यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करून तब्बल 500 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याची तक्रार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ईडीकडे केली आहे.
त्याच्या दोन नोटिसा बबन दादा शिंदे यांना बजावल्या आहे. शिंदेंची ईडी मार्फत चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेश स्तरावरचे पदाधिकारी वसंत मुंडे यांनी शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झालेले कृषी मंत्री दादा भुसे हे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असल्याची तक्रार गेल्याच आठवड्यामध्ये लेखी स्वरूपात ईडीला दिली आहे.
वसंत मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना सुद्धा दादा भुसे यांच्या कृषी खात्याअंतर्गत सुरू असलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते जरी केंद्रीय संस्थांवरती आरोप लावत असले तरी प्रत्यक्षात ईडीची विश्वासार्हता वाढल्यामुळेच की काय पण सत्ताधारी पक्षातले नेते सुद्धा एकमेकांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी ईडीकडे जात आहेत असं दिसत आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या :
- आणीबाणी जाहीर केल्यानंतर श्रीलंकेत निदर्शने, कर्फ्यूचे उल्लंघन केल्याप्रकरणी 600 पेक्षा जास्त जणांना अटक
- Sri Lanka Financial Crisis : श्रीलंकेत आणीबाणी लागू, अर्थव्यवस्था पुरती ढासळली; महागाईमुळे संतप्त जनतेकडून जाळपोळ
- Odisha : प्रेमीयुगुलाच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या डिलीव्हरी बॉयची तरुणीला बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल