एक्स्प्लोर

शिर्डी संस्थानचे सबुरीचं धोरण, 30 सप्टेंबरपर्यंत स्वीकारणार दोन हजारांच्या नोटा, त्यानंतर मात्र नोटांना 'नो एन्ट्री'

30 सप्टेंबरनंतर दोन हजारच्या नोटा न टाकण्याचं साई संस्थांनने भक्तांना आवाहन केले आहे. 30 सप्टेंबरपर्यंत साईंच्या दानपेटीत दोन हजारच्या नोटा स्वीकारणार असल्याचं शिर्डी संस्थानने सांगितलं आहे.

Rs 2000 Note : रिझर्व्ह बँकेच्या (RBI) दोन हजारांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयानंतर, असंख्य भाविकांची श्रद्धा असलेल्या साईबाबांच्या शिर्डी संस्थानने सबुरीचं धोरण अवलंबलं आहे. 30 सप्टेंबरनंतर दोन हजारांच्या नोटा दानपेटीत टाकू नका असं आवाहन आतापासूनच शिर्डी  संस्थानच्या वतीने भाविकांना करण्यात येत आहे. साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी सिवा शंकर यांनी हे आवाहन केलं आहे. 30 सप्टेंबरपर्यंत साईंच्या दानपेटीत दोन हजारांच्या नोटा स्वीकारण्यात येतील मागील नोटबंदीच्या काळातील नोटा पडून असल्यानं साई संस्थानने हा निर्णय घेतला असल्यांचं सांगितलं जात आहे. शिर्डी संस्थानात दररोज लाखो रुपयांचं दान येत असतं. भाविक मोठ्या प्रमाणात शिर्डी संस्थानात दान करत असतात. त्यामुळे त्याच पार्श्वभूमीवर शिर्डी संस्थानकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

मागील नोटबंदीच्या अनुभवावरुन आताचा निर्णय 

मोदी सरकारने 500 आणि 1000 च्या नोटा बंद केल्यानंतर शिर्डी संस्थानमध्ये या नोटा भाविकांनी दान केल्या होत्या. अनेक भक्तांनी दानपेटीत या नोटा टाकल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिर्डी संस्थानच्या दानपेटीत या नोटा जमा झाल्या होत्या.  नोटबंदीच्या काळात जवळपास 3 कोटी रुपयांच्या नोटा साईंच्या दानपेटीत जमा झाल्या होत्या. या नोटा आजही तशाच पडून आहेत. त्यामुळे पुन्हा तशी वेळ येऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं शिर्डी संस्थानकडून सांगितलं जात आहे. 

गुलाबी नोटांचा प्रवास लवकरच संपणार 

रिझर्व्ह बँकेने नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार 30 सप्टेंबरनंतर 2000 च्या नोटा चलनातून बाद होणार आहे. या नोटांची कायदेशीर अवैध्य असणार असल्याचं आरबीआयनं म्हटलं आहे. तसेच या गुलाबी नोटांनी केवळ साडे सहा वर्षांचा प्रवास केला असून आता या नोटा रद्द करण्याचा निर्णय आरबीआयनं घेतला आहे. 

500 आणि 1000 च्या नोटा बंद झाल्यानंतर 2000 च्या नोटा चलनात आल्या होत्या. सुरुवातीला मोठ्या प्रमाणात या नोटा चलनात होत्या. त्यावेळी त्यांचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जात होता. परंतु कोरोनाच्या काळानंतर अर्थव्यवस्था पुन्हा जम बसवत होती. परंतु त्यावेळेस दोन हजाराच्या नोटा मात्र गायब होऊ लागल्या होत्या. . तसेच मागील तीन वर्षांपासून एकही दोन हजारांची नोट छापण्यात आली नाही आहे. सर्वसामान्य लोकांना मात्र या नोटांचा बऱ्यापैकी त्रास व्हायचा, कारण 500 नंतर थेट 2000 च्या नोटा चलनात होता. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Rs 2000 Note : विठुराया गरीबांचा अन् शेतकऱ्यांचा देव... भक्तांनीही दान केलेल्या दानामध्ये दोन हजारांच्या नोटांचे प्रमाण अत्यल्प

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ZP Election Result 2026: अजितदादांच्या राष्ट्रवादीची जोरदार मुसंडी; जिल्हा परिषदेतील 200 जागांचा चक्रावणारा पहिला कल हाती, मोठी उलथापालथ
अजितदादांच्या राष्ट्रवादीची जोरदार मुसंडी; जिल्हा परिषदेतील 200 जागांचा चक्रावणारा पहिला कल हाती, मोठी उलथापालथ
Chhatrapati Sambhajinagar: आठवडी बाजारासमोर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
आठवडी बाजारासमोर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
Chhatrapati Sambhajinagar ZP election result 2026: छत्रपती संभाजीनगरच्या 'मिनी मंत्रालयाचा' कारभारी कोण? जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगरच्या 'मिनी मंत्रालयाचा' कारभारी कोण? जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
Solapur ZP election result 2026 मोठी बातमी! सोलापुरात मोहिते पाटलांना धक्का, उत्तम जानकरांचेही स्वप्न भंगले; भाजपच्या संस्कृती सातपुते विजयी
मोठी बातमी! सोलापुरात मोहिते पाटलांना धक्का, उत्तम जानकरांचेही स्वप्न भंगले; भाजपच्या संस्कृती सातपुते विजयी

व्हिडीओ

Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report
Solapur Mohol EVM : सोलापुरात मोहोळमध्ये धक्कादायक प्रकार, धाब्याच्या बाहेर EVM मशीन Special Report
Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ZP Election Result 2026: अजितदादांच्या राष्ट्रवादीची जोरदार मुसंडी; जिल्हा परिषदेतील 200 जागांचा चक्रावणारा पहिला कल हाती, मोठी उलथापालथ
अजितदादांच्या राष्ट्रवादीची जोरदार मुसंडी; जिल्हा परिषदेतील 200 जागांचा चक्रावणारा पहिला कल हाती, मोठी उलथापालथ
Chhatrapati Sambhajinagar: आठवडी बाजारासमोर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
आठवडी बाजारासमोर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
Chhatrapati Sambhajinagar ZP election result 2026: छत्रपती संभाजीनगरच्या 'मिनी मंत्रालयाचा' कारभारी कोण? जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगरच्या 'मिनी मंत्रालयाचा' कारभारी कोण? जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
Solapur ZP election result 2026 मोठी बातमी! सोलापुरात मोहिते पाटलांना धक्का, उत्तम जानकरांचेही स्वप्न भंगले; भाजपच्या संस्कृती सातपुते विजयी
मोठी बातमी! सोलापुरात मोहिते पाटलांना धक्का, उत्तम जानकरांचेही स्वप्न भंगले; भाजपच्या संस्कृती सातपुते विजयी
Kolhapur ZP and Panchayat Samiti Result: कोल्हापुरात पहिला गुलाल काँग्रेसला; सुरुवातीच्या कलांमध्ये कोल्हापूर झेडपी, पंचायत समितीमध्ये काँग्रेस आघाडीवर; राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर
कोल्हापुरात पहिला गुलाल काँग्रेसला; सुरुवातीच्या कलांमध्ये कोल्हापूर झेडपी, पंचायत समितीमध्ये काँग्रेस आघाडीवर; राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर
Solapur ZP election result 2026: सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल; माढ्यात राष्ट्रवादीने खातं खोललं, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल; माढ्यात राष्ट्रवादीने खातं खोललं, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Sharad Pawar: शरद पवारांना गोविंद बागेत भेटण्यासाठी आलेल्यांना न भेटताच परतावे लागले; कारण...
शरद पवारांना गोविंद बागेत भेटण्यासाठी आलेल्यांना न भेटताच परतावे लागले; कारण...
Raigad ZP Election Results Winner List: रायगड जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
Raigad ZP Election Results Winner List: रायगड जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
Embed widget