एक्स्प्लोर
शिर्डीत साईबाबांना 45 लाखांचा सुवर्णहार अर्पण
दिल्लीच्या साईभक्ताकडून ही सुवर्णभेट साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आली

शिर्डी : गुरुपौर्णिमा उत्सव काळात तब्बल सहा कोटी रुपयांचं दान साईचरणी अर्पण झाल्यानंतरही दानाचा ओघ सुरुच आहे. साईबाबांना आज 45 लाख रुपये किमतीचा सोन्याचा हार अर्पण करण्यात आला. दिल्लीच्या साईभक्ताकडून ही सुवर्णभेट साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आली. रत्नजडित असलेल्या या दीड किलो वजनी सोन्याच्या हाराची किंमत जवळपास 45 लाख रुपये असल्याची माहिती आहे.
सुंदर नक्षीकाम केलेला सोन्याचा हार साईचरणी अर्पण करण्यात आला. दिल्लीच्या साईभक्ताने हा सुवर्णहार अर्पण केला असून त्याच्या उपस्थितीत हा हार साईंच्या मूर्तीवर चढवण्यात आला. यावेळी साई संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी भक्ताचा सत्कार केला. मात्र संबंधित साईभक्ताने आपलं नाव जाहीर न करण्याची अट संस्थानला घातली असल्याचं समजतं.
सुंदर नक्षीकाम केलेला सोन्याचा हार साईचरणी अर्पण करण्यात आला. दिल्लीच्या साईभक्ताने हा सुवर्णहार अर्पण केला असून त्याच्या उपस्थितीत हा हार साईंच्या मूर्तीवर चढवण्यात आला. यावेळी साई संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी भक्ताचा सत्कार केला. मात्र संबंधित साईभक्ताने आपलं नाव जाहीर न करण्याची अट संस्थानला घातली असल्याचं समजतं. Before You Go
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















