एक्स्प्लोर
शिल्पा शेट्टी साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत, सोन्याचा मुकूट अर्पण
शिल्पा शेट्टीने कुटुंबासह साई दरबारी हजेरी लावली होती. बाबांच्या धुपारतीला हजेरी लावत सगळ्यांनी साईसमाधीचं मनोभावे दर्शन घेतले. यावेळी शिल्पासोबत राज कुन्द्रा, आई, मुलगा आणि बहीण शमिता शेट्टी हे उपस्थित होते.
शिर्डी : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी गुरुवारी संध्याकाळी कुटुंबीयांसह शिर्डीच्या साईबाबा चरणी लीन झाली. यावेळी तिने साईबाबांना 800 ग्रॅम सोन्याचा मुकूट अर्पण केला. या मुकुटाची किंमत अंदाजे 25 लाख आहे. सोन्याचं दान किती आहे यापेक्षा मनातील श्रद्धा आणि भाव महत्त्वाचं असल्याचं शिल्पाने सांगितलं.
शिल्पा शेट्टीने कुटुंबासह साई दरबारी हजेरी लावली होती. बाबांच्या धुपारतीला हजेरी लावत सगळ्यांनी साईसमाधीचं मनोभावे दर्शन घेतले. यावेळी शिल्पासोबत राज कुन्द्रा, आई, मुलगा आणि बहीण शमिता शेट्टी हे उपस्थित होते.
शिल्पा ही शिर्डीच्या साईबाबांची निस्सीम भक्त असून वर्षातून किमान एकदा तरी ती साई दर्शनासाठी आवर्जून येते. शिल्पाच्या विनंतीवरुन अर्पण केलेला सुवर्ण मुकूट साईबाबांच्या मूर्तीला काही वेळ परिधान करण्यात आला. त्यानंतर साईबाबांच्या धुपारतीतही शिल्पाने संपूर्ण परिवारासह उपस्थिती दर्शवली.
दरम्यान तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी आणि भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. साईबाबा संस्थानच्यावतीने उपजिल्हाधिकारी मनोज घोडे यांनी त्यांचा शाल मूर्ती देऊन सत्कार केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
महाराष्ट्र
राजकारण
भारत
Advertisement