वर्षा बंगल्यासमोरून दहा वेळा फोन केले, पण आम्हाला आत घेतले नाही; दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar ) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
![वर्षा बंगल्यासमोरून दहा वेळा फोन केले, पण आम्हाला आत घेतले नाही; दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल shinde group leader deepak kesarkar criticism on shiv sena chief uddhav thackeray वर्षा बंगल्यासमोरून दहा वेळा फोन केले, पण आम्हाला आत घेतले नाही; दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/53ec84099453d9ded855d8b09f4ab81a1665404850866328_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : वर्षा बंगल्याच्या रस्त्यावर उभं राहून दहा वेळा फोन केले की आतमध्ये यायचं की नाही. पण आम्हाला आत प्रवेश दिला नाही, असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar ) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांच्यावर केलाय. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर काल उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोरी केलेल्या आमदार आणि खासदारांवर जोरदार टीका केली होती. 50 खोके घेऊन आपल्याच आईच्या काळजात यांनी कट्यार खुपसली असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यांच्या या टीकेला दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेतून उत्तर दिलंय.
बंडखोरी केलेल्या लोकांना गद्दार म्हटलं जात आहे. परंतु, या 40 लोकांमुळेच तुम्ही मुख्यमंत्री झालात असा हल्लाबोल देखील दीपक केसरकर यांनी केलाय. "महाराष्ट्रातील लोकांची आणि शिवसेनेची दिशाभूल केली जात आहे. उद्धव ठाकरे यांच्याबद्द्ल मला आदर आहे. पण त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्याला उत्तर देणं गरजेचं आहे. आपली मुळ विचारधारा राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत नाही. उद्धव ठाकरे यांनी 40 या चाळीस लोकांमुळे तुम्ही मुख्यमंत्री झाला होता. त्यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही असं दीपक केसरकर म्हणाले.
दीपक केसरकर म्हणाले, "हे मंत्रीमंडळ स्थापन केलं त्यावेळी भाजपसोबत बोलणं झालं नव्हत. 20 आमदार गेल्यानंतरही 20 आमदार तुम्हाला पक्ष वाचवू हे सांगायला आले होते. परंतु, त्यावेळी तुम्ही म्हणालात की तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही देखील जा. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देण्याचं आशावासन दिलं होतं की नाही? बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी शब्द पाळला असता. तरी देखील मुख्यमंत्री पदाचा प्रश्न नव्हता. परंतु, तुम्ही त्यांच्या आग्रहाला बळी पडला नसता तर हे झालं नसतं. बाळासाहेब यांचे हिंदुत्व पाहून आम्ही तुमच्याकडे आलो होतो.
"ज्या भाजपला तुम्ही शिव्या घालता त्या भाजपसोबत तुम्ही का जायला तयार होता. भाजपने एक ही पद न घेता तुम्हाला मुंबई महापालिकेत पाठिंबा दिला. त्यामुळे तुम्ही राज्य करत आहात. आता जे आमदार दिसतात त्यापैकी दहा आमदार देखील पाहायला मिळाले नसते. अशी अवस्था राष्ट्रवादीने केली असती, असा हल्लाबोल दीपक केसकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलाय.
महत्वाच्या बातम्या
Maharashtra Politics Shivsena: ...म्हणून चिन्ह आणि पक्ष दोन्ही लांब गेले; दीपक केसरकरांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)