एक्स्प्लोर
नांदेड महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या शीला भवरे
काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 74 मतं मिळाली. अपक्ष नगरसेवकांनीही काँग्रेसला मतदान केलं.
नांदेड : काँग्रेसच्या शीला भवरे नांदेड महापालिकेच्या महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. तर उपमहापौरपदी विनय गरडे यांची निवड झाली. काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 74 मतं मिळाली. अपक्ष नगरसेवकांनीही काँग्रेसला मतदान केलं.
भाजप उमेदवारांचा 68 मतांनी पराभव पराभव झाला. तर शिवसेनेच्या एकमेव नगरसेवकाने कुणालाही मतदान न करता तटस्थ भूमिका घेतली. खासदार अशोक चव्हाणांच्या नेतृत्त्वात नांदेड वाघाळा महापालिकेत, काँग्रेसने एकहाती सत्ता स्थापन करुन, भाजपचा सूपडासाफ केला होता. काँग्रेसने 81 पैकी तब्बल 73 जागा पटकावल्या.
नांदेड-वाघाळा महापालिकेतील पक्षीय बलाबल
- काँग्रेस – 73
- भाजप – 06
- एमआयएम – 00
- शिवसेना – 01
- अपक्ष/इतर – 01
नांदेड वाघाळा महापालिका निकाल – विजयी उमेदवारांची यादी
नांदेडमध्ये ‘अशोक’चक्र, भाजप भुईसपाट!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
विश्व
Advertisement