एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
माझी चूक झाली उदयनराजेंना लोकसभेचं तिकीट दिलं, भर पावसात शरद पवार बरसले
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज साताऱ्यात तुफानी पावसातही सभा घेतली. पवार बोलायला उभे राहिले आणि जोरदार पाऊस सुरु झाला. परंतु पवारांनी भर पावसातही सभा सुरुच ठेवली.
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज साताऱ्यात तुफानी पावसातही सभा घेतली. पवार बोलायला उभे राहिले आणि जोरदार पाऊस सुरु झाला. परंतु पवारांनी भर पावसातही सभा सुरुच ठेवली. यावेळी बोलताना पवारांनी साताऱ्याचे माजी खासदार आणि भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
शरद पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी खूप मोठी चूक केली, मी उदयनराजे भोसलेंना साताऱ्यातून उमेदवारी दिली. भर पावसात भिजतच शरद पवारांनी भाषण केलं. यावेळी पवार उदयनराजेंवर बरसले.
आज सकाळी 10 वाजता पंढरपूर आणि त्यानंतर अंबाजोगाईची सभा केल्यानंतर शरद पवार यांची साताऱ्यामध्ये संध्याकाळी सभा होती. साताऱ्याच्या या सभेत शरद पवार काय बोलणार? याकडे सर्वाचे लक्ष लागले होते.
शरद पवार भाषणाला उभे राहिले आणि पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र त्या पावसातही शरद पवार यांनी भाजप - सेनेला चांगलेच झोडपून काढले.
शरद पवार म्हणाले की, वरुणराजानेदेखील आपल्याला आशिर्वाद दिले आहेत. त्याच्या आशिर्वादाने सातारा जिल्ह्यात चमत्कार होणार आहे आणि याची सुरुवात 21 तारखेपासून होणार आहे.
एखाद्या माणसाकडून चूक झाली की, त्याने ती चूक कबुल करायची असते. लोकसभेच्या निवडणूकीमध्ये माझ्याकडून चुक झाली होती, अशी जाहीर कबुली पवारांनी यावेळी दिली. साताऱ्याचा प्रत्येक माणूस ती चूक सुधारण्यासाठी 21 तारखेची वाट बघत आहे, अशी आशा शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
पवारांचं झंझावाती भाषण पाहा
लढाई पैलवानांमध्ये होते इतरांमध्ये नाही, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
भविष्य
निवडणूक
Advertisement